नागपूर जिल्ह्यातील अपघातात सेवानिवृत्त कृषी उप सचिवासह ट्रॅव्हल्स मालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 13:18 IST2019-04-02T13:17:47+5:302019-04-02T13:18:12+5:30

भरधाव वेगातील ट्रॅव्हल्स व अल्टो कार अपघातात सेवानिवृत्त कृषी उपसचिव व ट्रॅव्हल्सचा मालक घटनास्थळीच ठार झाले. सदर अपघात आज (दि. २) सकाळी ९ वाजताच्या सुमारास रानमांगली शिवारात झाला.

Retired agriculture deputy secretariat killed in an accident in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील अपघातात सेवानिवृत्त कृषी उप सचिवासह ट्रॅव्हल्स मालक ठार

नागपूर जिल्ह्यातील अपघातात सेवानिवृत्त कृषी उप सचिवासह ट्रॅव्हल्स मालक ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: भरधाव वेगातील ट्रॅव्हल्स व अल्टो कार अपघातात सेवानिवृत्त कृषी उपसचिव व ट्रॅव्हल्सचा मालक घटनास्थळीच ठार झाले. सदर अपघात आज (दि. २) सकाळी ९ वाजताच्या सुमारास रानमांगली शिवारात झाला.
मृतकांमध्ये अल्टो कार चालक अशोक तानबाजी उईके (५८) सानपाडा मुंबई (मूळगाव वर्धा) व ट्रॅव्हल्स मालक पंकज भाऊराव खापर्डे (३५) रा. ब्रम्हपूरी याचा समावेश आहे. अशोक उईके हे मंत्रालयातील कृषी व पदुम विभागाचे उपसचिव असून काही महिन्यापूर्वीच ते सैवानिवृत्त झाल्याचे कळते. प्राप्त माहितीनुसार ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच ३४ बि.जी. ४२५२ ही गडचिरोली कडून नागपूरकडे भरधाव वेगात जात होती दरम्यान विरूध्द दिशेने येणाऱ्या अल्टो कार क्रमांक एम.एच. ४९ बी.बी. ०६६७ ला जबर धडक दिली. धडक इतकी जबर होती की, ट्रॅव्हल्सच्या दारावर उभा असलेला ट्रॅव्हल्स मालक पंकज खापर्डे हा ट्रॅव्हल्सच्या खाली पडून थेट मागच्या चाकात सापडला तर अल्टो कारच्या दर्शनी भागाचाही चुराडा झाला. यात कार चालवित असलेल्या उईके यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Retired agriculture deputy secretariat killed in an accident in Nagpur district

टॅग्स :Accidentअपघात