शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व नागपुरातील भूखंडांचे आरक्षण रद्द

By admin | Updated: May 16, 2016 03:01 IST

पूर्व नागपुरातील बरेच भूखंड वाणिज्यिक (कमर्शिअल), होलसेल मार्केट व प्राथमिक शाळेसाठी ठेवण्यात आलेल्या आरक्षणांमुळे बाधित होते.

कृष्णा खोपडे यांच्या प्रयत्नांना यश : ३००० भूखंडधारकांना दिलासानागपूर : पूर्व नागपुरातील बरेच भूखंड वाणिज्यिक (कमर्शिअल), होलसेल मार्केट व प्राथमिक शाळेसाठी ठेवण्यात आलेल्या आरक्षणांमुळे बाधित होते. संबंधित आरक्षणे हटविण्यात यावी, यासाठी आमदार कृष्णा खोपडे यांनी राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा केला. शेवटी राज्य सरकारने संबंधित आरक्षणे रद्द केली आहेत. याचा फायदा पूर्व नागपुरातील मौजा भरतवाडा व मौजा हरपूर येथील सुमारे तीन हजार भूखंडधारकांना होणार आहे.पूर्व नागपुरातील हजारो भूखंड विविध आरक्षणाने बाधित आहेत. बहुतांश आरक्षित भूखंडांवर नागरिकांनी बांधकामे केली आहेत. भूखंड आरक्षित असल्यामुळे नागरिकांना या भूखंडांची खरेदी- विक्री करता येत नव्हती. शिवाय घर बांधण्यासाठी बँकेकडून कर्जही मिळत नव्हते. या परिसराच्या विकासावरही याचा परिणाम झाला होता. गेल्या २५ वर्षांपासून येथील नागरिक आरक्षण वगळण्याची मागणी करीत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय गांभीर्याने घेतला व हजारो नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला. आरक्षण वगळल्यामुळे मौजा भरतवाडा येथील विवेकानंद मिशन को-आॅप हा. सोसायटी, धनलक्ष्मी को-आॅप हा. सोसायटी, शिवनेरी को-आॅप हा. सोसायटी, साईनगर को-आॅप हा. सोसायटी, पुष्पक साईनगर को-आॅप हा. सोसायटी, मालिक मकबुजा, शिवाजीनगर भाडेकरू, गांधीकुटी गृहनिर्माण सहकारी संस्था, महादेवनगर गृहनिर्माण सहकारी संस्था, धनलक्ष्मी को-आॅप हा. सोसायटी, मंगळवारी को-आॅप हा. सोसायटी, नरहरी गृहनिर्माण संस्था तसेच मौजा हरपूर येथील जीवनोदय हाऊसिंग सोसायटीचा समावेश आहे. (प्रतिनिधी)विकासाचा मार्ग मोकळा नागपूर शहरातील भूखंडांच्या आरक्षणाचे विषय गेल्या अनेक वर्षांपासून राजकीयदृष्ट्या प्रलंबित होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टप्प्याटप्प्याने सर्व आरक्षणांना मुक्त करून भूखंडधारकांना मोठा न्याय मिळवून दिला आहे. आरक्षण वगळल्यामुळे या भागात विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. - आ. कृष्णा खोपडे