शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

काचबिंदूवर नागपूरच्या दोन तज्ज्ञांचे संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 11:13 IST

Nagpur News नागपूरच्या दोन तज्ज्ञांनी संशोधन करून अनोखे ‘फॉर्म्युलेशन’ तयार केले. यात डोळ्यांत औषध टाकताना ते द्रव रूपात असते आणि नंतर ते जेलमध्ये रूपांतरित होते.

ठळक मुद्दे‘फॉर्म्युलेशन’ला मिळाले पेटंटद्रव रूपात टाकलेले औषध जेलमध्ये रूपांतरित

सुमेध वाघमारे

 लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : काचबिंदूमध्ये (ग्लॉकोमा) डोळ्यांतील दाब कमी करण्यासाठी आय ड्रॉप दिला जातो. परंतु, तो पातळ असल्याने लवकर बाहेर पडतोे. डोळ्यांत टिकून राहत नसल्याने त्याचा फारसा प्रभाव पडत नाही. ते टिकावे म्हणून जेल दिले जाते. परंतु, अनेकांना डोळे चुरचुरण्याचा त्रास होतो. यावर नागपूरच्या दोन तज्ज्ञांनी संशोधन करून अनोखे ‘फॉर्म्युलेशन’ तयार केले. यात डोळ्यांत औषध टाकताना ते द्रव रूपात असते आणि नंतर ते जेलमध्ये रूपांतरित होते. या ‘फॉर्म्युलेशन’ला नुकतेच पेटंट मिळाले. याची मानवी चाचणी यशस्वी झाल्यास काचबिंदू उपचारात मोठा फायदा होऊ शकतो, असे नेत्ररोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गुरू नानक कॉलेज ऑफ फार्मसीच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. मिथाली बोधनकर व त्यांचे विद्यार्थी असलेले फार्मा कोविजिलन्स असोसिएट गजानन पानपत्ते यांनी या नव्या ‘फॉर्म्युलेशन’चा शोध लावला आहे. त्यांच्या या संशोधनाला डिसेंबर २०२० मध्ये ‘पेटंट’ मिळाले.

ग्लॉकोमा हा डोळ्यांच्या आजारांचा समूह आहे. कुठलेही लक्षणे न दिसता दृष्टी हिरावून घेण्यास तो कारणीभूत ठरतो. डोळ्यांच्या तंतूंना इजा पोहोचून दृष्टी जाते व ‘इन्ट्रॉक्यूलर प्रेशर’ चा परिणाम होतो. या मज्जातंतूचे कार्य लाखो तार जुळलेल्या विद्युत केबलप्रमाणे असते. ते डोळ्यांमधून मेंदूमार्फत प्रतिमा तयार करण्यास कारणीभूत असतात. अनेकदा अ‍ॅडव्हान्स स्टेजपर्यंत पोहोचल्याशिवाय ग्लॉकोमाचे निदानही होत नाही. देशात १२ लाख लोक या आजाराने ग्रस्त आहेत. त्यातील जवळपास १.२ लाख लोकांनी दृष्टी गमावली आहे. यामुळे यावरील हे संशोधन महत्त्वाचे मानले जात आहे.

- प्राण्यांवर केलेल्या चाचणीचे चांगले रिझल्ट- डॉ. बोधनकर

‘लोकमत’शी बोलताना डॉ. बोधनकर म्हणाल्या, २०१४ मध्ये या ‘फॉर्म्युलेशन’ला पेटंटकरिता सादर केले. त्याच्या पाच-सहा वर्षांपूर्वीपासून संशोधन सुरू होते. हे फॉर्म्युलेशन दोन औषधी मिळून तयार केले आहे. डोळ्यांत टाकताना हे औषधी द्रव रूपात असते आणि डोळ्यांत गेल्यावर त्याचे जेल होते. यामुळे डोळ्यांत हे औषधी जास्त वेळ टिकून राहते. वाहून जात नाही. यामुळे उपचारात मदत होते. औषधी कमी लागतात. या ‘फॉर्म्युलेशन’ची प्राण्यांवर चाचणी झाली आहे. त्याचे चांगले ‘रिझल्ट’ आले आहेत. आता पेटंट मिळाल्याने लवकरच मानवी चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर ही औषधी बाजारात आणली जाईल.

-तर ग्लॉकोमावरील उपचारात मोठी मदत - डॉ. मदान

वरिष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ व मेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे माजी प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी सांगितले, जसा रक्तदाब असतो, तसाच डोळ्यातील द्रवाचाही दाब असतो. त्याचा परिणाम ‘ऑप्टिक नर्व्ह’वर होतो आणि मग दृष्टी गमवावी लागू शकते. विशिष्ट औषध टाकून आहे ती दृष्टी वाचविणे, मग शस्त्रक्रिया करणे हाच काचबिंदूवरील उपाय आहे. डोळ्यांत टाकण्यात येणाऱ्या औषधामुळे दाब नियंत्रित राहतो व वाहिन्यांची हानी होत नाही. परंतु, औषधी पातळ असल्याने ते लवकर वाहून जाते. ते टिकून राहण्यासाठी व त्याचा प्रभावीपणे उपयोग होण्यासाठी तयार करण्यात आलेले हे ‘फॉर्म्युलेशन’ ग्लॉकोमावरील उपचारात मोठी मदत होऊ शकेल. परंतु, मानवी चाचणी केल्यानंतरच त्याची सिद्धता स्पष्ट होईल.

टॅग्स :Healthआरोग्य