व्यावसायिक गॅसवरील १८% जीएसटी हटवा ! 'ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन'ची केंद्र सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 15:52 IST2026-03-28T15:49:47+5:302026-03-28T15:52:36+5:30

Nagpur : पेट्रोल आणि डिझेलवरील 'व्हॅट' (VAT) कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयाचे 'ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन'तर्फे स्वागत करण्यात आले आहे.

Remove 18% GST on commercial gas! 'Consumer Vigilance Welfare Foundation' demands from the Central Government | व्यावसायिक गॅसवरील १८% जीएसटी हटवा ! 'ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन'ची केंद्र सरकारकडे मागणी

Remove 18% GST on commercial gas! 'Consumer Vigilance Welfare Foundation' demands from the Central Government

नागपूर : पेट्रोल आणि डिझेलवरील 'व्हॅट' (VAT) कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयाचे 'ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन'तर्फे स्वागत करण्यात आले आहे. मात्र, आता व्यावसायिक एलपीजीच्या (Commercial LPG) वाढत्या किमतींमुळे छोटे व्यापारी आणि रिक्षाचालक अडचणीत आले असून, त्यावरील १८% जीएसटी तातडीने कमी करावा, असे आवाहन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन सोळंके यांनी केले आहे.

​लहान व्यापाऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले

​नितिन सोळंके यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधताना सांगितले की, व्यावसायिक एलपीजीवर सध्या १८% जीएसटी लागू आहे. गॅसचे दर ५५-६० रुपयांवरून आता थेट ८०-८५ रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे छोटे हॉटेल व्यावसायिक, रेस्टॉरंट चालक आणि प्रामुख्याने ऑटो रिक्षा चालकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

​मध्यमवर्गीयांच्या खिशाला कात्री

व्यावसायिक गॅस महागल्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होत आहे. हॉटेलमधील खाद्यपदार्थ आणि परिवहन सेवा महागल्याने मध्यमवर्गीय आणि सामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. ज्याप्रमाणे इंधनाचे दर कपात करून जनतेला दिलासा देण्यात आला, त्याच धर्तीवर व्यावसायिक गॅसवरील जीएसटी दरातही तातडीने कपात करावी, अशी मागणी फाउंडेशनने केली आहे.

​"आजचा छोटा व्यापारी आणि आमचा रिक्षाचालक भाऊ हा 'रोज कमवतो आणि रोज खातो'. १८% जीएसटीचा हा प्रचंड बोजा त्यांच्या 'जीवनाचे चाक' थांबवत आहे. सरकारने गॅस स्वस्त केला, तरच या कष्टकऱ्यांच्या घरचा चुल्हा पेटत राहील आणि देशाची अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने रुळावर येईल."
- नितिन सोळंके, राष्ट्रीय अध्यक्ष, ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन.

Web Title : व्यावसायिक गैस पर 18% जीएसटी हटाएं: केंद्र सरकार से मांग।

Web Summary : उपभोक्ता संगठन ने व्यावसायिक एलपीजी पर जीएसटी कम करने की मांग की, छोटे व्यवसायों जैसे रेस्तरां और ऑटो-रिक्शा चालकों के लिए कठिनाई का हवाला दिया। गैस की उच्च कीमतें भोजन लागत और परिवहन को प्रभावित करती हैं, जिससे मध्यम वर्ग पर बोझ पड़ता है। फाउंडेशन ने तत्काल सरकारी कार्रवाई का आग्रह किया।

Web Title : Remove 18% GST on commercial gas: Demand to Central Government.

Web Summary : Consumer organization demands GST reduction on commercial LPG, citing hardship for small businesses like restaurants and auto-rickshaw drivers. High gas prices impact food costs and transportation, burdening the middle class. The foundation urges immediate government action.