शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

ग्रीक, इजिप्तच्या व्यापाऱ्यांच्या खेळाचे अवशेष सापडले नागपुरात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 2:37 AM

श्री जयवर्धनेपुरा विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये यावर डॉ. गेडाम यांनी शोधपत्र सादर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळविली आहे. 

निशांत वानखेडे

नागपूर : जिल्ह्यातील कुहीजवळ भिवकुंड येथील गुफामध्ये अतिप्राचीन काळात खेळल्या जाणाऱ्या अनोख्या खेळाचा शोध लागला आहे. याला ‘फोनेशियन’ किंवा ‘मनकला’ म्हणून ओळखले जाते. इ.स. पूर्व ६ ते ३ ऱ्या शतकात हा खेळ इजिप्त, ग्रीक, आफ्रिका आदी देशात लोकप्रिय असल्याचे अवशेष सापडतात. हे २६०० वर्षापूर्वीचे अवशेष असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर हा शोध अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. 

यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आकाश गेडाम आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रवास व पर्यटन विभागाचे प्रा. डॉ. प्रियदर्शनी खोब्रागडे यांच्यासह विद्यार्थी अमर बरसागडे, प्रमोद चव्हाण यांनी कुहीवरून ११ किमीवर असलेल्या भिवकुंड येथे या खेळाच्या अवशेषाचा शोध घेतला आहे.  सप्टेंबर २०२० मध्ये सोसायटी ऑफ साऊथ एशियन आर्किओलॉजी पुणे, श्रीलंका नॅशनल कमिशन फॉर युनेस्को, श्री जयवर्धनेपुरा विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये यावर डॉ. गेडाम यांनी शोधपत्र सादर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळविली आहे. 

गुफेतील अवशेष आणि खेळभिवकुंडच्या गुफा क्र. २ मध्ये २ ते ३ व्यासाचे व तेवढ्याच खोलीचे काही खोलगट खड्डे आढळले. ते प्रमाणबद्ध पद्धतीने उकरले असल्याचे लक्षात येते. हा तोच प्राचीन खेळ असल्याचे समजते. यामध्ये दोन खेळाडू खेळत असून, खेळणी म्हणून शंख-शिंपले, कवळ्या, बिया व लहान दगडाचा वापर होत असेल. जो अधिक खेळणी जिंकेल तो विजेता ठरत असल्याचे डॉ. गेडाम यांनी सांगितले.

अवशेषांचे संदर्भ कुठे कुठे? इ.स. पूर्व ६ ते ३ ऱ्या शतकात फोनशियन जमातीचे व्यापारी हा खेळ खेळत असल्याची माहिती आहे. तसेच खेळाचे अंकन इजिप्तमधील पिरॅमिड, कारनाक मंदिरातही आढळते. पूर्व आफ्रिका व उत्तर अमेरिकेत या खेळाचे अवशेष सापडले आहेत. आफ्रिकेत ‘वारी’ व ‘ओव्हरे’  नावाने तो लोकप्रिय आहे. आपल्या देशात दक्षिणेकडे विजयनगर साम्राज्यात ‘पोलिगुझी’ या नावाने हा खेळ खेळण्याचे संदर्भ आढळले असल्याचेही डॉ. गेडाम यांनी सांगितले. 

उत्खननात प्राचीन बौद्ध स्तूप, रोमन नाणी व ‘अस्सक प्राचीन काळी इजिप्त व ग्रीकच्या व्यापाऱ्यांनी हा खेळ सोबत आणला असावा. या खेळाला ‘अस्सकला’ असे वैदर्भीय नामकरण योग्य वाटते. - प्रा. डॉ. आकाश गेडाम, गणित व मानविकी विज्ञान