धर्म, व्यवसायाच्या आधारे सवलती नाकारणे संविधानविरोधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 01:18 AM2018-04-13T01:18:49+5:302018-04-13T01:19:04+5:30

संविधानात हलबा, हलबी म्हणून सवलती असताना सरकारकडून सवलती नाकारण्यात येत असून धर्म व व्यवसायाच्या आधारावर सवलती नाकारणे हा प्रकार संविधानविरोधी असून संविधानाचा अपमान आहे, असे मत अ‍ॅड नंदा पराते यांनी व्यक्त केले.

Religion, on the basis of business, denial of concessions against the Constitution | धर्म, व्यवसायाच्या आधारे सवलती नाकारणे संविधानविरोधी

धर्म, व्यवसायाच्या आधारे सवलती नाकारणे संविधानविरोधी

Next
ठळक मुद्देनंदा पराते : महात्मा फुले जयंतीनिमित्त महिला संघर्ष मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संविधानात हलबा, हलबी म्हणून सवलती असताना सरकारकडून सवलती नाकारण्यात येत असून धर्म व व्यवसायाच्या आधारावर सवलती नाकारणे हा प्रकार संविधानविरोधी असून संविधानाचा अपमान आहे, असे मत अ‍ॅड नंदा पराते यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले जयंतीनिमित्त हलबा सांस्कृतिक भवन पाचपावली येथे आयोजित महिला संघर्ष मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी गीता जळगावकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शकुंतला वट्टीघरे, मंजरी पौनीकर, मंजू पराते, शालू नंदनवार, शारदा खवास, सविता बुर्डे, आशा आसोटकर, प्रभावती देवघरे, अलका दलाल, ललिता पौनीकर, कल्पना अड्याळकर, प्रमिला वाडीघरे उपस्थित होत्या. नंदा पराते म्हणाल्या, आदिम महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे काळाची गरज आहे. महिलांच्या उपोषण आंदोलनामुळे सत्ताधाऱ्यांना धडकी बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. गीता जळगावकर यांनी महिलांना रस्त्यावर उतरून आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले. प्रभावती देवघरे यांनी महिलांना भाजप सरकारला जाब विचारण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक ललिता खेताडे यांनी केले. संचालन अनिता हेडावू यांनी केले. आभार मंदा शेंडे यांनी मानले. यशस्वितेसाठी निर्मला वरुडकर, रूपाली मोहाडीकर, वेणू पौनीकर, कल्पना मोहपेकर, गीता बंडोले, चंद्रकला डेकाटे, गीता आमनेरकर, लीला मौदेकर, लीला पिंपळीकर, पुष्पा शेटे, कमल पराते आदींनी परिश्रम घेतले.

 

 

Web Title: Religion, on the basis of business, denial of concessions against the Constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.