शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
2
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
3
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
4
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
5
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
6
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
7
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
8
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
9
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
10
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
11
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
12
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
13
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
14
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
15
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
16
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
17
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
18
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
19
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
20
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
Daily Top 2Weekly Top 5

फुले दाम्पत्यावरील डाक तिकिटाचे लोकार्पण

By admin | Updated: May 13, 2014 00:24 IST

बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा जोतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरील टपाल तिकिटाचे

 भरगच्च उपस्थिती : यवतमाळ येथील समतापर्व-२0१४

यवतमाळ : बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा जोतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरील टपाल तिकिटाचे लोकार्पण रविवारी ११ मे रोजी यवतमाळात आयोजित समता पर्वात थाटात करण्यात आले.

फुले दाम्पत्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील योगदानाची दखल घेऊन भारत सरकारच्या केंद्रीय टपाल विभागाच्यावतीने काढण्यात आलेल्या या डाक तिकिटाचे लोकार्पण समता मैदानावर आयोजित महात्मा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता पर्वात भरगच्च उपस्थितीत करण्यात आले. यावेळी टाळ्यांच्या कडकडाटात फुले दाम्पत्यांना चळवळीतील कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.

महात्मा फुले यांना ११ मे १८८८ रोजी महात्मा ही पदवी देण्यात आली होती. या दिनाचे औचित्य साधून भारत सरकारतर्फे ही डाक तिकीट काढण्यात आली आहे.

यावेळी इंडियन फेलेटिकल ब्युरोचे सदस्य डॉ. चंद्रभान भोयर, बी.के.गिरी, ज्ञानेश्‍वर गोबरे, प्रा.अशोक वानखडे, दत्ता चांदोरे आदींसह समता पर्वा प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

११ मे १८८८ ला ज्योतिराव फुले यांना मुंबई येथील कोळी वाड्यात आयोजित समारंभात जनतेच्यावतीने ‘महात्मा’ ही पदवी देण्यात आली होती. त्याच दरम्यान महात्मा ज्योतिराव फुले यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा महत्वपूर्ण ग्रंथ लिहून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती दिली होती.

याच दिवसाचे औचित्य साधून भारत सरकारच्या फेलेटिकल ब्युरोने माय स्टॅम्प योजनेअंतर्गत फुले दाम्पत्यांचे डाक तिकीट काढण्याचा निर्णय घेतला आहे. समता पर्वाच्या निमित्ताने या डाक तिकिटाचे विमोचन करून फुले दाम्पत्याच्या क्रांतीकार्याला अनोखे अभिवादन करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)

.