नागपूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी रेखा कृपाले
By कमलेश वानखेडे | Updated: August 20, 2023 16:50 IST2023-08-20T16:49:48+5:302023-08-20T16:50:07+5:30
याप्रसंगी रेखा कृपाले यांनी शहरातील महिलांचे प्रश्न पक्ष संघटनेच्या बळावर सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

नागपूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी रेखा कृपाले
नागपूर :नागपूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी रेखा कृपाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात कृपाले यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता प्रविण कुंटे पाटील, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब , माजी महिला शहर अध्यक्ष नूतन रेवतकर, ज्योती लिंगायत , राजा बेग, संगीता खोब्रागडे, प्रमिला टेम्भेकर , बबिता सोमकूवर यांचेसह महिला व पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी रेखा कृपाले यांनी शहरातील महिलांचे प्रश्न पक्ष संघटनेच्या बळावर सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शहरात महिलांचे संगठन मजबूत करून प्रत्येक प्रभागात किमान एक सक्षम महिला उमेदवार तयार करण्याचा निर्धार व्यक्त केला.