शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

आधी दुरांतोतील झटके कमी करा, मगच बुलेट ट्रेन चालवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 22:57 IST

मुंबई-नागपुर दुरांतोने प्रवास करताना जोरात झटके बसतात. प्रवाशांना गंभीर दुखापत होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आधी दुरांतोतील प्रवाशांना बसणारे झटके बंद करून नंतर बुलेट ट्रेन चालविण्याचा विचार करावा, असे प्रतिपादन सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष व रेल्वे मेन्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष आर. पी. भटनागर यांनी केले.

ठळक मुद्देआर. पी. भटनागर यांचे प्रतिपादन : रिक्त पदांसाठी ‘सीआरएमएस’चे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई-नागपुर दुरांतोने प्रवास करताना जोरात झटके बसतात. प्रवाशांना गंभीर दुखापत होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आधी दुरांतोतील प्रवाशांना बसणारे झटके बंद करून नंतर बुलेट ट्रेन चालविण्याचा विचार करावा, असे प्रतिपादन सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष व रेल्वे मेन्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष आर. पी. भटनागर यांनी केले.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे सुरक्षिततेवर आयोजित कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आलेले असताना त्यांनी ‘डीआरएम’ कार्यालयाच्या समाधान सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला.भटनागर म्हणाले, रेल्वेत मोठ्या संख्येने पदे रिक्त आहेत. यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. पदभरती, गु्रप डी श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाचे निर्धारण, पर्यवेक्षकीय पदांकरिता ४,८०० ग्रेड पे आदी संघटनेच्यामागण्या प्रलंबित आहेत. चर्चेतून काही मागण्यांवर तोडगा निघाला असून काही प्रलंबित आहेत. आगामी काळात कर्मचाºयांच्या हिताचे प्रश्न सेंट्रल रेल्वे मजदूर संघ लावून धरणार आहे. देशव्यापी धरणे आणि निदर्शनाच्या माध्यमातून संघटना प्रशासनाचे लक्ष वेधुन घेणार आहे. रेल्वे प्रवाशांमध्ये रेल्वेप्रति विश्वास वाढविण्यासाठी त्यांना सुरक्षित प्रवासाची शाश्वती देणे गरजेचे आहे. परंतु कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, कामाचा ताण यामुळे सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत कर्मचाऱ्यांच्या अडचणी प्रशासनाकडे मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळेची बचत करण्यासाठी रेल्वेने हायस्पीड आणि सेमी हायस्पीड ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्वागतार्ह असला तरी यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फारसा फायदा होणार नाही. पत्रकार परिषदेला सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे नागपूर विभागाचे मार्गदर्शक विनोद चतुर्वेदी, झोनल कार्यकारिणीतील कार्यकारी अध्यक्ष देबाशिष भट्टाचार्य, विभागीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह, सचिव बंडू रंधई, संघटक ई. व्ही. राव, वाय. डब्ल्यू, गोपाल, पुरुषोत्तम वानखेडे उपस्थित होते.‘सीएसटीएम’ची इंचभर जागा देणार नाहीमुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ब्रिटिशकालीन हेरिटेज इमारतीत सध्या मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांचे कार्यालय आहे.या संपूर्ण इमारतीला संग्रहालयाच्या रूपाने विकसित करण्याचा प्रयत्न रेल्वे मंत्रालयाच्यावतीने करण्यात येत आहे. त्यामुळे संग्रहालयासाठी या इमारतीची इंचभरही जागा देणार नाही, अशा इशारा आर. पी. भटनागर यांनी सरकारला दिला. त्यासाठी ८ मार्चपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून, ३ एप्रिलपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरnagpurनागपूर