शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

आयकर विभागातील पदभरती घोटाळ्याने खळबळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 12:02 AM

आयकर विभागात पदभरती घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. सीबीआयने तपासानंतर १२ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे आयकर विभाग हादरला आहे.

ठळक मुद्देसीबीआयने चौकशीनंतर केला गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयकर विभागात पदभरती घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. सीबीआयने तपासानंतर १२ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे आयकर विभाग हादरला आहे.सीबीआय सूत्रानुसार, हा पदभरती घोटाळा २०१२ ते २०१४ दरम्यान करण्यात आलेल्या पदभरतीचा आहे. यादरम्यान स्टेनो आणि एमटीएस, मल्टी टास्किंग स्टाफची भरती करण्यात आली होती. त्यात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी सीबीआयला प्राप्त झाल्या होत्या. तपासात आयकर विभागात नोकरी मिळविणाऱ्या  तब्बल १२ कर्मचाऱ्यांनी स्टाफ सिलेक्शन कमिशन(एसएससी)च्या अधिकाऱ्यांसह संगनमत करून बोगस पद्धतीने नोकरी मिळवली. त्यांनी परीक्षेत आपल्या नावावर दुसऱ्यालाच परीक्षेला बसवून परीक्षा उत्तीर्ण केली. तपासात ही बाब उघडकीस येताच सीबीआयने आयकर विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीमध्ये मुख्य आयकर आयुक्त कार्यालयात कार्यरत स्टेनो रिंकी यादव, आशिष कुमार, एमटीएस सरिता अनिल कुमार, राहुल कुमार, अभय कुमार, मुकेश कुमार, चंदन कुमार, प्रदीप कुमार, मनोज कुमार, मनीष कुमार, धर्मेंद्र कुमार आणि इतर काही अज्ञात कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.परीक्षेदरम्यान बदलले फोटोग्राफमिळालेल्या माहितीनुसार, वर्ष २०१२ ते २०१४ दरम्यान या कर्मचाºयांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून नोकरीसाठी अर्ज केला. दोन्ही पदांच्या भरतीसाठी दोन परीक्षा असतात. दोन्हीसाठी वेगवेगळे प्रवेशपत्र दिले जातात. दोन्ही परीक्षेदरम्यान परीक्षार्थींना इन्वीजिलेटरचे पास साईन आणि आपल्या डाव्या हाताचा अंगठा लावणे आवश्यक असते. आरोपींनी मोठ्या चलाखीने काम केले. आपल्या हॉल तिकीटवर लागलेले फोटो बदलविले. साईनऐवजी केवळ साध्या पद्धतीने आपले नाव लिहिले. त्यामुळे बोगस उमेदवारांना त्यांची स्वाक्षरी करण्यास जास्त अडचण आली नाही. परीक्षा संपली. तीन वर्षांत याच पद्धतीने १२ उमेदवारांनी नोकरी मिळविली. यासंबंधात सीबीआयला तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीच्या आधारावर सीबीआयने चौकशी केली. स्टाफ सिलेक्शनला त्यांचे परीक्षासंबंधी सर्व दस्तऐवज मागितले. दस्तऐवजामध्ये स्वाक्षरी व अंगठ्याचे ठप्पे वेगवेगळे आढळून आले. या तपासात असेही आढळून आले की, त्यांनी एका परीक्षेत डमी उमेदवार बसवला तर दुसऱ्या परीक्षेत खरा उमेदवार. यातच त्यांची चोरी पकडल्या गेली. हा सर्व प्रकार स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने होणे शक्य नाही. त्यामुळे सीबीआयने स्टाफ सिलेक्शनच्या अज्ञात अधिकारी वकर्मचाऱ्यांनही आरोपी बनवले आहे.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सCBIगुन्हा अन्वेषण विभाग