शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

नागपूर मनपाच्या कोविड सेंटरसाठी डॉक्टर-परिचारिकांची होणार भर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 10:10 AM

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी संबंधित हेल्थकेअर सेंटरच्या मनुष्यबळाची व्यवस्था सुरू केली आहे.. त्यांनी तज्ज्ञ डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय आदी कंत्राटी पद्धतीवर नियुक्त करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठवला आहे.

ठळक मुद्देतीन महिन्यात ९७.९८ लाख रुपये मानधनावर खर्च होण्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे पाच डेडिकेटेड हेल्थकेअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. परंतु डॉक्टर व मनुष्यबळ नसल्याने त्याचे संचालन होत नव्हते. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी संबंधित हेल्थकेअर सेंटरच्या मनुष्यबळाची व्यवस्था सुरू केली आहे.. त्यांनी तज्ज्ञ डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय आदी कंत्राटी पद्धतीवर नियुक्त करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठवला आहे. कंत्राटी पद्धत, करार आधारावर मानधन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन महिन्यासाठी ९७.९८ लाख रुपये मंजुरी देण्याचा प्रस्ताव येत अहे.

प्रस्तावांतर्गत फिजिशियन व इन्टेंसिव्ह केअर तज्ज्ञांना ७५ हजार रुपये फिक्स मानधन व इन्सेंटिव्ह १.२५ लाख रुपयापर्यंत दिले जाईल. तज्ज्ञ डॉक्टरांच्या ११ पदांना मंजुरी देण्यात येईल. यात फिजिश्यिन, इन्सेंटिव्ह केअर, अ‍ॅनेस्थेशिया तज्ज्ञ आदींचा समावेश राहील. त्याचप्रकारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना आयसीयूमध्ये पीपीई किट घालून राहावे लागेल. अशा परिस्थितीत एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस, बीयूएमएस डॉक्टरांना १० हजार रुपये, स्टाफ नर्सला ७ हजार रुपये व कंत्राटी पद्धतीवर कार्यरत वॉर्ड बॉयला ३ हजार रुपये अतिरिक्त दिले जातील. दर महिन्याला वेतनावर ३२.६६ लाख रुपये खर्च होईल. आरोग्य विभागाच्या आस्थापना खर्चातून संबंधित निधीला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.पद संख्यास्पेशलिस्ट डॉक्टर ११मेडिकल ऑफिसर ३७हॉस्पिटल मॅनेजर ०५स्टाफ नर्स ११५एक्स रे टेक्निशियन ०५इसीजी टेक्निशयन ०५डाटा एन्ट्री ऑपरेटर १०वॉर्ड बॉय ३०

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका