शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमी युगुलाला लुटणारे ‘तोतया’ नव्हे तर खरे पोलीस कर्मचारी

By योगेश पांडे | Updated: April 21, 2024 22:13 IST

गणेशपेठमधील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा एक युवक हा १३ एप्रिलला एका विवाहित महिलेला कारमध्ये घेऊन गेला. दोघेही वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आऊटर रिंगरोडवर एफएलडी हॉटेलच्या विरुद्ध बाजुला कारमधील लाईट बंद करून बसले होते.

नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारमध्ये बसलेल्या प्रेमी युगुलाला लुटणारे आरोपी तोतया पोलीस नव्हे तर खरे पोलीस निघाले. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून त्यांच्याविरोधात वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेशपेठमधील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा एक युवक हा १३ एप्रिलला एका विवाहित महिलेला कारमध्ये घेऊन गेला. दोघेही वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आऊटर रिंगरोडवर एफएलडी हॉटेलच्या विरुद्ध बाजुला कारमधील लाईट बंद करून बसले होते. त्यावेळी कळमना पोलीस ठाण्यातील पंकज यादव व संदीप यादव हे दोन कर्मचारी तेथे पोहोचले. त्यांनी तरुणावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच महिलेच्या कुटुंबियांनाही पोलीस ठाण्यात बोलवून बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे विवाहित असलेली महिला घाबरली. पंकज आणि संदीपने त्यांना पैसे मागितले. मात्र, त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे दोन्ही पोलिसांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची मागणी केली. तसेच तरुणाच्या गळ्यातील तीन तोळ्यांची चेनदेखील नेली. तरुणाने वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली व पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अगोदर पोलिसांना आरोपी तोतया पोलीस असल्याची शंका आली. मात्र सीसीटीव्ही व तांत्रिक पद्धतीने तपास केला असता त्यात पंकज व संदीप हे दोघे असल्याची बाब समोर आली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी याअगोदरदेखील असे प्रकार केल्याचा संशय आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही फरार झाले आहेत. हे दोघेही अगोदर चार्ली होते व त्यांच्याविरोधात गैरप्रकारांच्या तक्रारी आल्याने त्यांना हटविण्यात आले होते. आता पोलीस आयुक्तांकडून या दोघांवरही काय कारवाई करण्यात येते याकडे पोलीस वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस