शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

परवाना देण्यास ‘आरबीआय’ चा नकार

By admin | Updated: May 27, 2014 01:41 IST

हंगामापूर्वी शेतकर्‍यांना जिल्हा बँकेतून पीक कर्ज उपलब्ध होईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. यासंदर्भात राज्याच्या मंत्रिमंडळाने सकारात्मक पावलेही उचलली होती.

नागपूर : हंगामापूर्वी शेतकर्‍यांना जिल्हा बँकेतून पीक कर्ज उपलब्ध होईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. यासंदर्भात राज्याच्या मंत्रिमंडळाने सकारात्मक पावलेही उचलली होती. तसे पत्रही रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाला दिले होते. मात्र रिझर्व्ह बँकेने सरकारच्या पत्राला प्रतिसाद दिला नाही. विदर्भातील नागपूर, वर्धा व बुलडाणा बँकेला व्यवहाराचा परवाना देण्यास आरबीआयने चक्क नकार दिला आहे. त्यामुळे तीनही बँकांनी आरबीआयच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी पत्रपरिषदेत दिली. नागपूर जिल्हा सहकारी बँकेत २००२ मध्ये १५३ कोटींचा घोटाळा झाल्याने ही बँक आर्थिक अडचणीत आली होती. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेच्या व्यवहाराचा परवाना काढून घेतला होता. अशीच काहीशी अवस्था वर्धा व बुलडाणा जिल्हा बँकेची आहे. या बँकेच्या माध्यमातून हंगामाच्या काळात जिल्ह्यातील शेतकर्‍यांना ७० टक्के कर्जपुरवठा होत होता. या तीनही बँकांचे शेअर कॅपिटल ३१९ कोटी रुपये रिझर्व्ह बँकेत भरल्यास, बँकांना व्यवहार करण्याचा परवाना मिळू शकतो व शेतकर्‍यांनाही हंगामाच्या काळात कर्ज पुरवठा होऊ शकतो. या भावनेतून राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत बँकांच्या परवाना प्राप्तीसाठी शेअर कॅपिटलच्या स्वरूपात ३१९ कोटी रुपयांची मदत करण्याला मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली. यासंदर्भात राज्य सरकारने रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय कार्यालयाला पत्र लिहून आर्थिक मदत करीत असल्याचे कळविले. रिझर्व्ह बँकेने परवाना नाकारण्याबद्दल केलेली कार्यवाही मागे घेण्याची विनंती केली. मात्र आरबीआयने सरकारची विनंती अमान्य करून, कार्यवाही मागे घेणे शक्य नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे तीनही जिल्हा बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या कारवाईविरोधात केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयात अपील दाखल केले असून, उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी ३० मे रोजी होणार असल्याचे देशमुख म्हणाले. (प्रतिनिधी)