नागपुरात भरधाव कार टिप्परवर धडकली,एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 22:04 IST2019-03-30T22:03:54+5:302019-03-30T22:04:38+5:30
भरधाव कार रस्त्यावर उभा असलेल्या टिप्परवर धडकल्यामुळे कारमधील एकाचा करुण अंत झाला तर कार चालकासह दोघे गंभीर जखमी झाले.

नागपुरात भरधाव कार टिप्परवर धडकली,एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरधाव कार रस्त्यावर उभा असलेल्या टिप्परवर धडकल्यामुळे कारमधील एकाचा करुण अंत झाला तर कार चालकासह दोघे गंभीर जखमी झाले. अक्षय विनोद भांगे (वय २२, रा. लष्करीबाग, आंबेडकर कॉलनी) असे मृताचे नाव असून, जखमींमध्ये गौरव रवींद्र पिल्लेवान आणि मयूर शरद कवाडे (दोघेही रा. लष्करीबाग) यांचा समावेश आहे.
भांगे, पिल्लेवान आणि कवाडे हे तिघे मित्र इंडिगो कार (एमएच ३१/ईक्यू ०२६४) मधून शुक्रवारी रात्री ११.४० च्या सुमारास पाचपावलीतील अशोकनगर, आनंद बौद्ध विहाराजवळून जात होते. कारचा वेग जास्त होता. रस्त्याच्या मध्ये उभा असलेला टिप्पर (एमएच ४०/वाय ४४८६) कार चालक पिल्लेवानला दिसला नाही. त्यामुळे कार टिप्परच्या मागच्या भागावर धडकली. त्यामुळे कारमध्ये बसलेला भांगे ठार झाला तर पिल्लेवान आणि कवाडे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी महेंद्र तुळशीराम भांगे (वय ५५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी या अपघाताला कारणीभूत असलेल्या टिप्परच्या मालकावर गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.