शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

हृदय बंद पाडून केली दुर्मिळ शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 21:52 IST

हृदयापासून रक्ताला शरीराच्या दुसऱ्या भागात पाठविणाऱ्या महाधमणीमध्ये रक्ताचा दाब वाढल्याने धमणीच्या आतील पहिला स्तर म्हणजे ‘इन्टीमा’ फाटून ‘मेडीआ’ व ‘अ‍ॅडव्हेंशीआ’ या दोन स्तरातून रक्तपुरवठा होत असल्याने धमणी फुटून रुग्णाचा मृत्यू होण्याची भीती होती. रुग्ण प्रत्येक तासाला एक टक्का मृत्यूकडे ओढला जात होता. तातडीने शस्त्रक्रिया न झाल्यास तीन दिवसांत रुग्णाचा मृत्यू होण्याचा धोका होता. अत्यंत गुंतागुंतीची असलेली ‘अ‍ॅरोटिक असेन्डिंग डिसेक्शन’ ही शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सीव्हीटीएस विभागाचे प्रमुख डॉ. निकुंज पवार व त्यांच्या चमूने करण्याची जबाबदारी घेतली. तब्बल आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. विशेष म्हणजे, रुग्णाचे हृदय बंद पाडून, ४० मिनिटे रक्तभिसरण थांबवून महाधमणीवर शस्त्रक्रिया करून रुग्णाला जीवनदान दिले.

ठळक मुद्देसुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पहिली शस्त्रक्रिया : भाजीपाला विक्रेत्याला मिळाले जीवनदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हृदयापासून रक्ताला शरीराच्या दुसऱ्या भागात पाठविणाऱ्या महाधमणीमध्ये रक्ताचा दाब वाढल्याने धमणीच्या आतील पहिला स्तर म्हणजे ‘इन्टीमा’ फाटून ‘मेडीआ’ व ‘अ‍ॅडव्हेंशीआ’ या दोन स्तरातून रक्तपुरवठा होत असल्याने धमणी फुटून रुग्णाचा मृत्यू होण्याची भीती होती. रुग्ण प्रत्येक तासाला एक टक्का मृत्यूकडे ओढला जात होता. तातडीने शस्त्रक्रिया न झाल्यास तीन दिवसांत रुग्णाचा मृत्यू होण्याचा धोका होता. अत्यंत गुंतागुंतीची असलेली ‘अ‍ॅरोटिक असेन्डिंग डिसेक्शन’ ही शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सीव्हीटीएस विभागाचे प्रमुख डॉ. निकुंज पवार व त्यांच्या चमूने करण्याची जबाबदारी घेतली. तब्बल आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. विशेष म्हणजे, रुग्णाचे हृदय बंद पाडून, ४० मिनिटे रक्तभिसरण थांबवून महाधमणीवर शस्त्रक्रिया करून रुग्णाला जीवनदान दिले.बुटीबोरी येथे भाजीपाल्याचा व्यवसाय करणारा विजय पुंड (४५) यांना गेल्या काही दिवसांपासून हृदयात तीव्र वेदना व श्वास घेण्यास अडचण जात होती. ४ सप्टेंबर रोजी नातेवाईकांनी पुंड यांना मेडिकलमध्ये दाखल केले. रुग्णाची प्रकृती पाहता दुसºयाच दिवशी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदयशल्यचिकित्सा विभागात (सीव्हीटीएस) स्थानांतरित केले. डॉ. पवार यांनी पुंड याची तपासणी केल्यावर दुसºयाच दिवशी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. रुग्ण गरीब असल्याने व त्याच्याकडे आवश्यक कागदपत्रे असल्याने हे प्रकरण महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेकडे मंजुरीसाठी पाठविले, दुसºया दिवशी या योजनेतून शस्त्रक्रियेसाठी आवश्यक निधीची तरतूद होताच शस्त्रक्रियेला सुरुवात केली. तब्बल आठ तास शस्त्रक्रिया चालली. डॉ. पवार यांनी आपले अनुभव व कौशल्य पणाला लावत ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. अत्यंत दुर्मिळ आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पहिली ‘अ‍ॅरोटिक असेन्डिंग डिसेक्शन’ ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. या शस्त्रक्रियेत बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. विजय श्रोते, डॉ. अमरीश खटोड, डॉ. चंदनकुमार रायमहापात्र, डॉ. प्रचिती शेंडे, डॉ. विनय शिंपी, परिचारिका एम. गायकवाड, ए. हाडके, एस. चांभारे, के. विंचुरकर, एम. मारडे, एस. जामदार व बी. संदलवार आदींचे विशेष सहकार्य मिळाले.उर उघडल्यास धमणी फुटण्याची शक्यता होतीशस्त्रक्रियेची गुंतागुंत सांगताना डॉ. पवार म्हणाले, हृदय शस्त्रक्रियेमध्ये उर उघडणे ही सामान्यपणे पहिली पायरी असते. परंतु या रुग्णाच्याबाबतीत असे करणे शक्य नव्हते. कारण हृदयाच्या पातळ पिशवीत रक्त जमा होऊन ते निळे पडले होते. यामुळे पायाच्या रक्तवाहिनीतून बायपास करण्याच्या पद्धतीचा वापर केला. ‘बेन्टॉल प्रोसिजर’च्या मदतीने रुग्णाच्या उजव्या मांडीतील उर-धमणी आणि उर-शीरा या दोन्हीतून ‘कॅन्युला’ (नळी) टाकण्यात आली. रुग्णाला ‘कार्डिओ पल्मोनरी बायपास’ यंत्रावर ठेवण्यात आले. शरीराचे तापमान ३६ डिग्रीपासून सुरू करून हळूहळू १८ डिग्री सेल्सियसपर्यंत नेण्यात आले. या तापमानावर हृदय स्पंदन थांबते आणि आंकुचन होते. ही प्रक्रिया होताच शरीरातील रक्ताभिसरण पूर्णपणे थांबवण्यात आले. रुग्णाच्या शरीरातील संपूर्ण रक्त ‘हार्ट लंग’ यंत्रातील ‘व्हिनस रिझर्व्हायर’मध्ये साठवण्यात आले. रक्त पुरवठ्याच्या अभावामुळे होणाऱ्या क्षतीपासून मेंदूचे संरक्षण करण्यासाठी सगळी काळजी घेण्यात आली. ठरल्याप्रमाणे दोन्ही धमणी काढून टाकल्या. त्या ठिकाणी कृत्रिम धमणीचे रोपण करून मुख्य महाधमणीला जोडले. धमणीतून रक्तप्रवाह सुरू करण्यात आला. रुग्णाला पुन्हा उष्ण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शरीराचे तापमान सामान्य होताच हृदयाचे स्पंदन पुन्हा सुरू झाली. रक्तभिसरण बंद असण्याचा कालावधी ४० मिनिटांचा होता. हळूहळू मेंदूच्या मज्जासंस्थेत सुधारणा झाली. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून लवकरच त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात येईल, असेही डॉ. पवार म्हणाले.

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयHeart Attackहृदयविकाराचा झटका