भरदिवसा घरात शिरून तरुणीचा विनयभंग, जीवे मारण्याची धमकी

By योगेश पांडे | Updated: June 7, 2023 16:55 IST2023-06-07T16:51:53+5:302023-06-07T16:55:49+5:30

गुन्हा नोंदवत आरोपीला अटक

Rape of a young woman by entering the house in broad daylight | भरदिवसा घरात शिरून तरुणीचा विनयभंग, जीवे मारण्याची धमकी

भरदिवसा घरात शिरून तरुणीचा विनयभंग, जीवे मारण्याची धमकी

नागपूर : भरदिवसा घरात शिरून एका तरुणीचा विनयभंग करण्यात आला. आरोपीने तिला मारण्याची धमकी देत शिवीगाळदेखील केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

नारी उर्फ अरूण सुनिल टंडन (२५, कळमना) असे आरोपीचे नाव आहे. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास संबंधित तरुणी ही आपल्या घराचे दार लोटून झोपली होती. त्याचवेळी अरुण तेथे आला व तिच्या घराचे दार उघडून आत गेला. त्याने तिच्याशी अश्लिल वर्तन करून विनयभंग केला.

तरुणीने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिला शिवीगाळ करत धमकी दिली. बाहेर कुणालाही सांगू नकोस अन्यथा वाईट होईल, असा इशारादेखील दिला. याप्रकारामुळे तरुणी हादरली. तिने कळमना पोलीस ठाणे गाठून अरुणविरोधात तक्रार केली. पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली.

Web Title: Rape of a young woman by entering the house in broad daylight