शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

नागपुरातील राणे कुटुंब मृत्यू प्रकरण; चौघांना संपवण्याचे आक्रित कुणी घडविले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 10:51 AM

नागपूरसह सर्वत्र प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या कोराडीतील राणे कुटुंबातील चौघांच्या संशयास्पद मृत्यूमागचे कारण अधिकृतपणे उघड झालेले नाही.

ठळक मुद्दे डॉक्टर सुषमाकडे संशयाची सुई

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अभियांत्रिकी महाविद्यालयात विभागप्रमुख असलेले धीरज दिगंबर राणे (वय ४२) प्रचंड तणावात होते, पुरते खचले होते. त्यांची ही अवस्था पाहवली जात नसल्यामुळे डॉक्टर पत्नीने आक्रित घडवून तणावातून सर्वांचीच कायमची सुटका करून घेतल्याचा अंदाजवजा संशय आहे. धीरज, ध्रुव आणि वन्या या तिघांच्या मृतदेहाशेजारी आढळलेल्या रिकाम्या इंजेक्शनमुळे हा संशय घट्ट होतो, असे खास सूत्रांचे मत आहे.नागपूरसह सर्वत्र प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या कोराडीतील राणे कुटुंबातील चौघांच्या संशयास्पद मृत्यूमागचे कारण अधिकृतपणे उघड झालेले नाही. मात्र, आढळून आलेल्या सुसाईड नोटमधून काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या घटनेमागचे काही पैलू उघड झाले आहेत. त्यातून काही नाजूक पैलू या घटनेशी जुळले असावे, अशीही कुजबुज सुरू झाली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलीस यावर उघडपणे बोलतील. मात्र सुसाईड नोटचा मजकूर लक्षात घेतल्यास सुषमा यांनीच हे आक्रित घडवून आणले, अशी शंका घेण्यास वाव असल्याचे संबंधित सूत्रांचे मत आहे.

सुसाईड नोटमध्ये पती धीरज यांना उद्देशून सुषमा यांनी प्रारंभीच माफी मागितली आहे. ते प्रचंड तणावात होते, ते मानसिकरीत्या खचले होते. त्यांचे ते रोज रोज मरण बघवले जात नव्हते, म्हणून सुषमा यांनी चौघांनाही संपवण्याचा निर्णय घेतल्याचा सुसाईड नोटमध्ये मजकूर आहे. धीरज कशामुळे खचले होते, ते मात्र त्यात नमूद नाही. तुमच्या(धीरज)शिवाय तिघांच्या जगण्याला अर्थ नसल्याचाही सुसाईड नोटमध्ये उल्लेख आहे. मराठीत लिहून असलेल्या या सुसाईड नोटमधील आशय धीरज आणि सुषमा यांच्यातील जिव्हाळा आणि ताणतणाव असे दोन्ही पैलू उघड करणारा आहे.

अक्षरतज्ज्ञांकडून शहानिशाती चिठ्ठीवजा सुसाईड नोट सुषमा यांनी लिहून ठेवली, असा भास होत असला तरी ती खरोखर त्यांनीच लिहून ठेवली का, त्यांचेच ते अक्षर आहेत का, याची शहानिशा करण्यासाठी पोलीस हॅन्ड रायटिंग एक्सपर्ट अक्षरतज्ज्ञ यांची मदत घेणार आहेतसुसाईड नोट आणि खालील काही मुद्दे या प्रकरणात सुषमा यांनाच दोषी ठरवितात, असे संबंधित अधिकारी सांगतात.सुषमा डॉक्टर असल्याने धीरज, ध्रुव आणि वन्या यांना कोणते इंजेक्शन घेतल्याने काय होते, त्याची कल्पना असावी. डॉक्टर असल्याने त्याच इंजेक्शन देऊ शकतात.

तिघांची कोणतीही हालचाल अथवा आवाज सकाळपासून त्यांच्या घरात ऐकू आला नाही. परंतु सुषमा आज दुपारी १ वाजेपर्यंत जिवंत होत्या.पोलिसांना सुषमा यांचे पती, मुले वेगळ्या रूममध्ये वेगळ्या अवस्थेत तर सुषमा गळफास लावून आढळल्या. सकाळी ९ ते दुपारी १ या कालावधीत सुषमा दोनवेळा प्रमिला यांच्याशी बोलल्या, असे प्रमिला यांनी पोलिसांना सांगितले आहे.

 

टॅग्स :Suicideआत्महत्या