शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

रामटेकमध्ये कडकडीत बंद

By admin | Updated: March 10, 2016 03:39 IST

महाशिवरात्रीनिमित्त नागार्जुन टेकडीवर त्रिशूल नेण्यावरून शिवभक्त व पोलिसांमध्ये सोमवारी तणाव निर्माण झाला होता.

नागार्जुन टेकडी प्रकरण : पोलिसांची कारवाई चुकीची असल्याचा आरोपरामटेक : महाशिवरात्रीनिमित्त नागार्जुन टेकडीवर त्रिशूल नेण्यावरून शिवभक्त व पोलिसांमध्ये सोमवारी तणाव निर्माण झाला होता. जमावाकडून दगडफेक तर पोलिसांकडून लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हे नोंदवून त्यांना ताब्यात घेतले. त्या सर्वांना जामीन न मिळाल्यामुळे न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. पोलिसांची ही कारवाई चुकीची असल्याचा आरोप माजी आ. आशिष जयस्वाल यांनी केला. पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी रामटेक बंदचे सर्वपक्षीय आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन उपविभागीय अधिकारी राम जोशी यांना निवेदन सोपविले. मोर्चादरम्यान, पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नागार्जुनप्रकरणी पोलिसांनी संजय भिक्षूलाल दमाहे (२२, रा. चिचाळा), राहुल विद्याधर टोंगसे (३२, रा. रामटेक), अविनाश शेषराव येलुरे (२०, रा. नवरगाव), अशोक हुकुमपुरी गोसावी (४५, रा. घोटीटोक), गोकुल नारायण पाटील (३०, रा. रामटेक) व उमेश सुदाम झाडे (४०, रा. तेलंगखेडी, ता. रामटेक) या सहा जणांना अटक केली तर नरेश माकडे हा फरार आहे. त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३५३, ३३२, ३३३ व ४२७ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली. शिवभक्तांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर रामटेक बंदचे आयोजन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून नागार्जुन शिवमंदिरात महाशिवरात्रीला हजारो भाविक दर्शनासाठी जातात आणि त्रिशूल अर्पण करणे ही भक्तांची परंपरा आहे. या बाबीस मागील काही वर्षापासून काही जण आक्षेप घेत आहेत. पोलिसांकडून दरवर्षी शिवभक्तांना संरक्षण मिळते. यावर्षी पोलिसांनी भाविकांना अडवून त्रिशूल नेण्यास मज्जाव केला. त्यामुळे भाविक व पोलिसांमध्ये वाद झाला. दरम्यान, काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली, अशी माहिती बंदचे आंदोलकर्त्यांनी दिली. सदर प्रकरणात पोलिसांनी मिळेल त्यास पकडून अटक केली व गुन्हे नोंदविले. अटक केलेल्यांवर भादंवि कलम ३३३ सारखे कलम मुद्दाम दाखल करण्यात आले. कारण अटकेनंतर जामीन मिळू नये असा त्यामागे उद्देश होता. पोलिसांनी शिवभक्तांना संरक्षण देण्याऐवजी प्रथा, परंपरेनुसार धार्मिक विधी पार पाडण्यास प्रतिबंध केला. दरवर्षी महाशिवरात्रीला नागार्जुन परिसरात तणाव निर्माण होतो, ही माहिती असतानादेखील उपाययोजना म्हणून शांतता समितीची बैठक पोलिसांनी घेतली नाही. दरवर्षीचा तणाव लक्षात घेता योग्य पोलीस बंदोबस्तही नव्हता. असा आरोपही त्यांनी केला आहे. पोलिसांकडे घटनास्थळाची चित्रफित असताना त्यामध्ये भाग घेणाऱ्या असामाजिक तत्त्वांचा शोध घेऊन कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता पोलिसांनी मिळेल त्याला अटक करून कारवाई केली, हे योग्य नाही. (तालुका प्रतिनिधी)पोलिसांच्या कारवाईची चौकशी व्हावीदरम्यान, बुधवारी माजी आ. आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांशी या प्रकरणाबाबत चर्चा केली. पोलिसांच्या कारवाईची चौकशी व्हावी व जबाबदारी निश्चित करण्यात यावी. तसेच नागार्जुनप्रकरणी कायमस्वरुपी तोडगा काढून हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात पोलीस अधिकारी व उपविभागीय अधिकारी राम जोशी यांना विचारणा केली असता, उच्च न्यायालयाचा या परिसरात ‘जैसे-थे’चा आदेश आहे आणि तो पोलीस व प्रशासनाने पाळताना केलेली कारवाई उचित आहे, असे त्यांनी सांगितले. शिष्टमंडळात योगेश वाडीभस्मे, रमेश कारामोरे, सुनील देवगडे, बिकेंद्र महाजन, अनिल वाघमारे, राजेश किंमतकर,उमेश महाजन, सुमित कोठारी, दिनेश माकडे, धीरज राऊत, राजूबाबा मोहन गिरी महाराज, करीम मालाधारी, दीपक जैन, चुन्नीलाल चौरासिया, राहुल ठाकूर आदींची उपस्थिती होती.