शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

रामनामाचा गजर

By admin | Updated: April 16, 2016 02:43 IST

पश्चिम नागपूर नागरिक संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने पश्चिम नागपूर दुमदुमले.

श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमले पश्चिम नागपूरनागपूर : पश्चिम नागपूर नागरिक संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने पश्चिम नागपूर दुमदुमले. रामनगरातील राममंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आरती आणि पालखी पूजन झाल्यानंतर शोभायात्रेची सुरुवात झाली. यावेळी आमदार सुधाकर देशमुख, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, महापौर प्रवीण दटके, आमदार अनिल सोले, अभिजित मुजुमदार, अ‍ॅड आनंद परचुरे यांची उपस्थिती होती. राम मंदिरापासून प्रवेशद्वारापर्यंत भव्य रांगोळी काढण्यात आली होती.चित्ररथांनी वेधले लक्षपश्चिम नागपूर नागरिक संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेतील भव्य आणि आकर्षक चित्ररथांनी नागरिकांचे लक्ष वेधले. शोभायात्रेत अकरामुखी हनुमंताचे विराट रूप, भगवान शंकराचे अमरनाथ दर्शन, श्री साईबाबा दर्शन, बाळ श्रीकृष्णाला गणपती लाडू देताना, श्रीरामचंद्र दर्शन, कामदेवातर्फे शिवजींची तपस्या भंग, चंडिका दर्शन, तिरुपती बालाजी, जय मल्हार खंडोबा दर्शन, पंचमुखी श्री हनुमान दर्शन, श्री रामरथ, पंचमुखी श्री हनुमान दर्शन, श्री साईबाबा दर्शन, गरुड अवतार, माता पार्वतीद्वारा शिवलिंग पूजन, श्री कालीमाता दर्शन, श्रीराम भक्त हनुमान, दगडुशेठ गणपती दर्शन, हनुमान प्रभु श्रीरामचंद्राची आराधना करताना, आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजींना तलवार देताना, हनुमान श्रीराम, लक्ष्मण यांना घेऊन जाताना, भगवान विष्णूंना अवतार घेण्यासाठी सर्व देवातर्फे प्रार्थना करताना, सुरसेच्या मुखातून हनुमान बाहेर निघताना, कुंभकर्ण वध, श्रीराधाकृष्ण लीला या चित्ररथांनी भाविकांचे लक्ष वेधले. असंख्य नागरिक आपल्या कुटुंबीयांसह शोभायात्रेतील चित्ररथ पाहण्यासाठी उपस्थित होते.शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागतश्रीराम मंदिरातून शोभायात्रेचा शुभारंभ झाल्यानंतर मार्गात विविध संस्था संघटनांतर्फे शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. शोभायात्रा बाजीप्रभू चौक, लक्ष्मीभवन चौक, कॉफी हाऊस चौक, झेंडा चौक, लक्ष्मीनारायण मंदिर चौक, बटुकभाई चौक, शंकरनगर चौक, बजाजनगर चौक, लक्ष्मीनगर चौक, अभ्यंकरनगर चौक, व्हीएनआयटी गेट, एलएडी कॉलेज, कार्पोरेशन शाळा, हिल रोड, या मार्गाने श्रीराम मंदिरात पोहोचली. शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी विविध चौकात कमानी उभारण्यात येऊन नागरिकांनी पुष्पवृष्टी केली.