नागपूरच्या रामदासपेठेतील पॉश कुंटनखान्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:07 AM2018-09-15T00:07:16+5:302018-09-15T00:09:20+5:30

रामदासपेठेतील एका पॉश इमारतीत परिमंडळ दोनचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या पथकाने छापा मारून स्पा च्या आड चालणारा कुंटणखाना उजेडात आणला. या प्रकरणी स्पा मालकासह पाच जणांना अटक करण्यात आली असून, एक जण फरार आहे.

In Ramdaspeeth of Nagpur, raid on the posh brothel | नागपूरच्या रामदासपेठेतील पॉश कुंटनखान्यावर छापा

नागपूरच्या रामदासपेठेतील पॉश कुंटनखान्यावर छापा

googlenewsNext
ठळक मुद्देस्पा च्या आड वेश्याव्यवसाय : पाच वारांगना आढळल्या : पोलीस उपायुक्त पंडित यांच्या पथकाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामदासपेठेतील एका पॉश इमारतीत परिमंडळ दोनचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या पथकाने छापा मारून स्पा च्या आड चालणारा कुंटणखाना उजेडात आणला. या प्रकरणी स्पा मालकासह पाच जणांना अटक करण्यात आली असून, एक जण फरार आहे.
रामदासपेठेतील अजय सर्व्हिस अपार्टमेंटच्या तळ माळ्यावर आरोपी अजय आणि त्याचा भाऊ अभय लोहारकर स्पा चालवतात. दुसऱ्या माळ्यावर जीम असून, अन्य पाच माळ्यांवर हॉटेलसारख्या रूम आहेत. येथे लोहारकर बंधू स्पा च्या नावाखाली कुंटणखाना चालवितात, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्याची शहानिशा करून उपायुक्त पंडित यांच्या पथकाने तेथे छापा मारण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार, एका ग्राहकाला लोहारकरकडे पाठविण्यात आले. त्याने २५०० हजारात देहविक्रय करणारी वारांगना उपलब्ध करून देण्याचा सौदा केला. अजय लोहारकर तसेच स्पा चा व्यवस्थापक आलम मोहम्मद अब्बास याने रक्कम घेतल्यानंतर पाच वारांगना ग्राहकाला दाखवल्या. त्यातील एकीला पसंत करून ग्राहक एका रुममध्ये गेला. ठरल्याप्रमाणे इमारतीला घेराव घालून असलेले पोलीस पथक काही वेळेतच तेथे धडकले. पोलिसांचा छापा पडल्याचे लक्षात आल्यामुळे तेथून पळू पाहणारा अजय लोहारकर, मोहम्मद आलम, हेअर सलून करणारा विनेंद्र उरकुडे, गार्ड म्हणून असलेला संदीप मिश्रा तसेच एका वारांगनेसोबत असलेला ग्राहक अजय खडतकर या पाच जणांना पोलिसांनी पकडले. तेथे पाच वारांगना आढळल्या. पोलिसांनी त्यांची माहिती घेऊन त्यांना सोडून दिले.

कोहिमा, अरुणाचलम प्रदेशच्या तरुणी
अजय स्पा अ‍ॅन्ड सलूनच्या आड चालणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी पकडलेल्या पाच वारांगनांपैकी एक कोहिमाची होती. तिने तसेच अन्य जणांनी पोलिसांना धंतोलीत अजय संचलित करणाऱ्या एका हॉटेलचे नाव सांगितले.त्यानुसार, पोलीस पथकाने तेथेही छापा मारला. तेथे तीन तरुणी आढळल्या. त्यातील एक तरुणी अरुणाचल प्रदेशची होती. तेथे मात्र, ठोस असे काही आढळले नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांना चौकशी करून सोडून दिले. दरम्यान, सीताबर्डी पोलीस ठाण्यात आरोपी लोहारकर बंधू, त्याचा व्यवस्थापक मोहम्मद आलम, हेअर सलून करणारा विनेंद्र उरकुडे, गार्ड संदीप मिश्रा तसेच ग्राहक खडतकरविरुद्ध पिटा अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात आली. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार हेमंत कुमार खराबे, पीएसआय सचिन मते, धनश्री खुटेमाटे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

Web Title: In Ramdaspeeth of Nagpur, raid on the posh brothel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.