शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

राम जेठमलानी मांडणार माओवादी साईबाबाची बाजू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:45 IST

देशातील प्रसिद्ध वरिष्ठ अधिवक्ता राम जेठमलानी हे माओवादी चळवळीचा समर्थक व नक्षलींचा मास्टर माईन्ड....

हायकोर्ट : शिक्षेवर स्थगिती व जामिनासाठी अर्ज करणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशातील प्रसिद्ध वरिष्ठ अधिवक्ता राम जेठमलानी हे माओवादी चळवळीचा समर्थक व नक्षलींचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा (४७) याच्यासाठी लढण्याची शक्यता आहे. साईबाबा शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करणार आहे. साईबाबाच्या वतीने जेठमलानी यांनी युक्तिवाद करावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ७ मार्च २०१७ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने दहशतवादी कृत्याच्या प्रकरणात साईबाबा (४७) व इतर आरोपींना जन्मठेपेसह विविध वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. त्याविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले आहे. उच्च न्यायालयाने सर्वांचे अपील अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतले आहे. अन्य आरोपींमध्ये महेश करिमन तिरकी (२२), पांडू पोरा नरोटे (२७), हेम केशवदत्ता मिश्रा (३२) ,प्रशांत राही नारायण सांगलीकर (५४) व विजय नान तिरकी (३०) यांचा समावेश आहे. प्रा. साईबाबा दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होता. महेश तिरकी व नरोटे मुरेवाडा, ता. एटापल्ली (गडचिरोली), मिश्रा कुंजबारगल, जि. अलमोडा (उत्तराखंड), राही डेहराडून (उत्तराखंड) तर, विजय तिरकी धरमपूर, ता. पाखंजूर, जि. कांकेर (छत्तीसगड) येथील रहिवासी आहे. सर्व आरोपी दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे, दहशतवादी संघटनेसाठी कार्य करणे इत्यादी गुन्ह्यांमध्ये दोषी आढळून आले आहेत. आतापर्यंत केवळ महेश तिरकी व प्रशांत राही यांनीच शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. येणाऱ्या काही दिवसांत साईबाबा व अन्य आरोपीही असा अर्ज दाखल करणार आहे. साईबाबासाठी राम जेठमलानी यांनी युक्तिवाद करावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राहीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ अधिवक्ता नित्या रामाकृष्णन तर, तिरकीच्या वतीने नागपुरातील अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग कामकाज पहात आहेत. जेठमलानी यांना कागदपत्रे दिलीत साईबाबाच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता राम जेठमलानी यांनी युक्तिवाद करावा अशी इच्छा आहे. त्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. जेठमलानी यांना प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे देण्यात आली आहेत. त्यांचा होकार मिळण्याची शक्यता आहे. ते प्रकरणाचा अभ्यास करीत आहेत. - वसंता (साईबाबाची पत्नी).