दोन दिवसांपासून नागपूर शहरासह जिल्ह्यात पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:30 IST2018-04-10T00:30:21+5:302018-04-10T00:30:43+5:30
शहरात सोमवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेचा कडकडाट होऊन पावसाला सुरुवात झाली. किमान अर्धा तास तरी पाऊस सातत्याने झाल्याने वातावरण आल्हाददायक झाले. गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पाऊस बरसतो आहे.

दोन दिवसांपासून नागपूर शहरासह जिल्ह्यात पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात सोमवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेचा कडकडाट होऊन पावसाला सुरुवात झाली. किमान अर्धा तास तरी पाऊस सातत्याने झाल्याने वातावरण आल्हाददायक झाले. गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पाऊस बरसतो आहे.
हवामान खात्यानुसार सायक्लोनिक सर्क्युलेशनचा परिणाम विदर्भावर झाला आहे. त्याच कारणामुळे गेल्या दोन दिवसांपासून पाऊस बरसतो आहे. असे असले तरी सकाळापासून उन्हाचा तडाखाही चांगलाच जाणवत आहे. दुपारी अचानक आकाशात ढग दाटून येतात, त्यामुळे ऊन-सावलीचा खेळ सुरू होतो. सायंकाळ होता होता वाऱ्