लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :नागपूर विभागात मागील तीन दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस पडत असल्यामुळे नदी व नाल्यांना पूर आला आहे. मागील चोवीस तासांत ९५.६ मिमी पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत २६३ मिमी म्हणजेच सरासरी ७२.६२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. विभागात ४३ तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या ऑरेंज अलर्टमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या आहेत.
विभागातील ४५ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, यामध्ये नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यातील सात, गडचिरोली सहा, चंद्रपूर पाच आणि गोंदिया जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश आहे.
जिल्हा - अतिवृष्टी तालुके (पाऊस मि.मी)
- नागपूर : कुही (२२२.२), नागपूर शहर (१७०.५) नागपूर ग्रामीण (१४९.३) कामठी (१५८), हिंगणा (१५८.३), रामटेक (१३९.३), पारशिवनी (१०३.९), मौदा (१४३.४), काटोल (१०६), नरखेड (८७), कळमेश्वर (१८६.८).
- वर्धा : आर्वी १०८.९ , कारंजा १२८.८, आष्टी ७४.७ , वर्धा ९१, सेलू ९९.३ , देवळी ७८.८, हिंगणघाट १२८.३, समुद्रपूर १०६ .
- भंडारा : भंडारा १३२.२, पवनी १४९.७ , लाखांदूर १६४.७, लाखनी ८३.६, साकोली ७५.२ , मोहाडी ८५.८, तुमसर ७६.५.
- गोंदिया : देवरी १०४.५, सडक अर्जुनी १२०.६, मोरगाव अर्जुनी ८९.६
- चंद्रपूर : चिमूर १५१.४, ब्रह्मपुरी १४५.२, नागभीड १५०.३, सावली ९२.८ तर वरोरा तालुक्यात ८२.४.
- गडचिरोली : वडसा-देसाईगंज १३३.६, कोरची ८२.५, धानोरा ७०.५, आरमोरी ९२.४, कुरखेडा ८६.८, गडचिरोली ७६.