Vidarbha Rains : शेतीची नासाडी करून नाकीनऊ आणलेल्या मान्सूनने अखेर महाराष्ट्रातून काढता पाय घेतला आहे. विदर्भातून नियाेजित तारखेच्या तीन दिवसानंतर व संपूर्ण राज्यातून दाेन दिवसांपूर्वी पावसाने गाशा गुंडाळला आहे. महाराष्ट्र, गाेवाची सीमा ओलांडून त्याने कर्नाटक, तेलंगना, प. बंगाल व पूर्वाेत्तर राज्याकडे प्रवेश केला आहे.
सप्टेंबरप्रमाणे ऑक्टाेबरच्या पहिल्या आठवड्यातही पावसाने धुवांधार हजेरी लावली. विदर्भात जाेर कमी असला तरी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, काेकण भागात परतीचा पाऊस शेतीची नासाडी करून गेला. शेवटच्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे अताेनात नुकसान झाले आहे. विदर्भातही हजाराे हेक्टरमधील साेयाबिन, कापूस व संत्रा, माेसंबीचे नुकसान झाले आहे.
दरम्यान नागपूरसह विदर्भात गेल्या सहा दिवसांपासून पावसाची धार बंद झाली आहे. आकाश पूर्णपणे निरभ्र झाले आहे. त्यामुळे कमाल तापमानात किंचित वाढ दिसून येत आहे. त्यामुळे दिवसा काहीसा उकाडा जाणवत आहे. रात्री मात्र तापमानात घट हाेत असून घराबाहेर पडल्यास काहीशी गारव्याची अनुभूती हाेत आहे. मात्र थंडीचा कडाका वाढण्यास आणखी काही अवधी लागेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. दरम्यान हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार १५ ते २० ऑक्टाेबर या काळात म्हणजेच दिवाळीपूर्वी नरक चतुर्दशीपर्यंत विदर्भात व राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण तयार हाेण्याची व तुरळक ठिकाणी किरकाेळ पाऊस हाेण्याचीही शक्यता आहे.
विदर्भात झाला ११४ टक्के पाऊस
हवामान विभागाने मान्सूनपूर्व वर्तविलेल्या भाकितापेक्षा अधिक पाऊस यंदा नाेंदविण्यात आला. विदर्भात जून ते सप्टेंबर या काळात ९३७.३ मि.मी. सरासरी पावसाची नाेंद करण्यात येते. यावर्षी संपूर्ण सीजनमध्ये १०७१.९ मि.मी. पाऊस नाेंदविण्यात आला आहे, जाे सरासरीपेक्षा १४ टक्के अधिक आहे. नागपूरला १०२४.१ मि.मी. पाऊस झाला आहे, जाे सरासरीपेक्षा ९ टक्के अधिक आहे. सर्वाधिक १६१९.१ मि.मी. पाऊस गडचिराेली जिल्ह्यात झाला असून ताे २६ टक्के अधिक आहे.
विदर्भात झालेली नाेंद
जिल्हा झालेला पाऊस सरासरी पाऊस टक्केनागपूर १०२४.१ ९३८.९ ९भंडारा ११५३.३ १०८५.१ ६चंद्रपूर १२९७.७ १०७६.३ २१गडचिराेली १६१९.१ १२८९.७ २६गाेंदिया १२१२.२ १२१४.७ ०वर्धा १०३७.३ ८४०.८ २३अकाेला ६६६.१ ६९४.२ -४अमरावती ७५२.५ ८२२.९ -९वाशिम ९५० ७७२.३ २३यवतमाळ १०१८.६ ८०८.८ २६बुलढाणा ७२१.८ ६४७.१ ११विदर्भ १०७१.९ ९३९.३ १४
Web Summary : Monsoon retreats from Maharashtra after crop damage. Vidarbha received 114% of average rainfall. A cloudy environment and light rain are expected in Vidarbha and parts of the state before Diwali, between October 15th and 20th.
Web Summary : फसल क्षति के बाद मानसून महाराष्ट्र से पीछे हटा। विदर्भ में औसत वर्षा का 114% प्राप्त हुआ। दिवाली से पहले, 15 से 20 अक्टूबर के बीच विदर्भ और राज्य के कुछ हिस्सों में बादल छाए रहने और हल्की बारिश की संभावना है।