Railway Roko agitation on Tuesday for demand of independent Vidarbha state | स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मंगळवारी रेल रोको आंदोलन

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मंगळवारी रेल रोको आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याची त्वरित निर्मिती करा, या मागणीसाठी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे नागपुरातील मनीषनगर रेल्वे फाटक वर्धा रोड येथे रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी सांगितले, आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे. रेल रोको आंदोलनासाठी संपूर्ण विदर्भातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागपूरला पोहोचले आहेत. नवीन राज्याची निर्मिती करणे हे केंद्र सरकारच्या अधीन आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार असून त्यांनी कितीही विरोध केला तरी केंद्रातील भाजप सरकारला स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यापासून रोखू शकत नाही. तेव्हा भाजपाने दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करावी. बेरोजगारी संपविण्यासाठी, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, सिंचन व्यवस्था वाढविण्यासाठी सर्वांगीण विदर्भाच्या विकासासाठी फक्त स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती हाच एकमेव पर्याय असून त्यासाठीच हे आंदोलन असल्याचे नेवले यांनी स्पष्ट केले. याच मागणीसाठी १ मे रोजी संपूर्ण विदर्भात हरताळ पाळण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Railway Roko agitation on Tuesday for demand of independent Vidarbha state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.