शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

नागपुरातील बिल्डर्सवरील छापे; मालमत्ता नोकरांच्या नावाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 11:26 IST

नागपुरातील सहापैकी पाच बिल्डरांवरील प्राप्तिकर खात्याचे छापे गुरुवारी तिसºया दिवशीही सुरू होते. काल उशिरा रात्री अधिकाऱ्यांनी अ‍ॅड. चंद्रकांत पद्मावार यांच्याकडील कारवाई पूर्ण केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देबिल्डरांवर प्राप्तिकर खात्याचे छापे तिसऱ्या दिवशीही सुरूच

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील सहापैकी पाच बिल्डरांवरील प्राप्तिकर खात्याचे छापे गुरुवारी तिसºया दिवशीही सुरू होते. काल उशिरा रात्री अधिकाऱ्यांनी अ‍ॅड. चंद्रकांत पद्मावार यांच्याकडील कारवाई पूर्ण केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.आज प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली व उरलेले तीन बँक लॉकर्सही उघडले. या लॉकरमधून जवळपास दोन किलो सोन्याचे दागिने व बेनामी संपत्तीचे कागदपत्र सापडल्याची माहिती आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या पाच बिल्डरपैकी एका बिल्डरने दोन जमिनी आपल्या दोन नोकरांच्या नावाने खरेदी केल्याचे उघड झाले आहे. या मालमत्तांची एकूण किंमत अंदाजे २० कोटी आहे.बेनामी ट्रान्झॅक्शन (प्रोहिबिशन) अ‍ॅक्ट २०१६ या कायद्यानुसार बेनामी मालमत्ता सरकारजमा करण्याचा अधिकार प्राप्तिकर विभागाला आहे. अधिकाऱ्यांनी या दोन्ही मालमत्ता ताब्यात घेतल्या आहे व दोन्ही नोकरांची चौकशी सुरू केली आहे. आजच्या कारवाईमध्ये अतुल यमसनवार यांच्या आॅरेंज सिटी हाऊसिंग फायनान्सचा संचालक असलेल्या धंतोलीतील एका प्रख्यात बिल्डरचेही नाव समोर आले आहे. सदर्हू बिल्डर हा इतर सहा कंपन्यांचाही संचालक असून राजकीय वर्तुळात सक्रिय आहे.या बिल्डरचे यमसनवार यांच्याशी काय व्यावसायिक संबंध आहेत याचीही चौकशी प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे अशी माहिती सूत्रानी दिली.दरम्यान प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी या सहा बिल्डरांनी केलेले बेनामी व्यवहार २०० कोटींच्या घरात असावे असे अनुमान काढले आहे, परंतु नेमके किती उत्पन्न दडविले व किती करचोरी केली हे सगळ्या कागदपत्रांची छाननी/ पडताळणी झाल्यानंतरच कळू शकेल अशी माहिती मिळाली.आज प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी या सहाही बिल्डरांच्या घरात पी.यू. (प्रोटेक्टड युनिट) तयार केले आहेत. पी.यू.मध्ये घरातील एका खोलील जप्त केलेले दस्तावेज व इतर पुरावे ठेवले जातात व त्याला प्राप्तिकर खात्याचे अधिकारी कुलूप लावतात. या खोलीत केव्हाही येण्या-जाण्याचे अधिकार प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना असतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रोटेक्टेड युनिट ही शेवटची कारवाई समजली जाते त्यामुळे या पाचही बिल्डरांवरील छापे आज उशिरा रात्रीपर्यंत संपण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :raidधाड