खैरगाव येथील जुगारावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:11 IST2021-08-15T04:11:31+5:302021-08-15T04:11:31+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : पाेलिसांच्या पथकाने खैरगाव येथे सुरू असलेल्या जुगारावर शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ...

Raid on gambling in Khairgaon | खैरगाव येथील जुगारावर धाड

खैरगाव येथील जुगारावर धाड

लाेकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : पाेलिसांच्या पथकाने खैरगाव येथे सुरू असलेल्या जुगारावर शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धाड टाकली. यात जुगार खेळणाऱ्या दाेघांना अटक करण्यात आली असून, चाैघे पळून गेल्याने त्यांचा शाेध सुरू असल्याची माहिती ठाणेदार जयपालसिंग गिरासे यांनी दिली असून, आराेपींकडून एकूण १ लाख ४७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रफुल्ल विष्णू बनाईत (२३) व राजेंद्र माेतीराम बनाईत (४०) दाेघेही रा. खैरगाव, ता. नरखेड, अशी अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत. नरखेड पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना खैरगाव येथे जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी लगेच खैरगाव गाठले व जुगार आढळून येताच धाड टाकली. यात जुगार खेळणाऱ्या दाेघांना पकडण्यात पाेलिसांना यश आले असून, चाैघे मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले.

आराेपींकडून १ लाख ४७ हजार रुपये किमतीच्या चार माेटरसायकली, ५०० रुपये राेख व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण १ लाख ४७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार जयपालसिंग गिरासे यांनी दिली असून, पळून गेलेल्या आराेपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई ठाणेदार गिरासे, पाेलीस उपनिरीक्षक भाेसलेे, हवालदार साहेबराव मसराम, गजानन शेंडे, हेमंत बाभूळकर यांच्या पथकाने केली.

Web Title: Raid on gambling in Khairgaon