शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

रागदारीच्या स्वरांचा चिमुकल्यांचा ‘रागरंग घनश्याम’

By admin | Updated: September 14, 2014 01:06 IST

सांदीपनी शाळेच्या स्थापनादिनानिमित्त शाळेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात श्री श्री पर्वचे आयोजन करण्यात आले. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगावर इयत्ता पहिली ते चौथीच्या

सांदीपनी स्कूलचे आयोजन : श्री श्री पर्व सादरीकरण नागपूर : सांदीपनी शाळेच्या स्थापनादिनानिमित्त शाळेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात श्री श्री पर्वचे आयोजन करण्यात आले. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगावर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी भावपूर्ण सादरीकरण करून याप्रसंगी उपस्थितांची दाद घेतली. कृष्णाच्या नटखट लीला, सुदामाची भेट, गोपिकांना भंडावून सोडणे आणि माता यशोदेकडे तक्रार केल्याने त्रासून गेलेली पण कृष्णावर निरातिशय प्रेम करणारी आई, असे अनेक प्रसंग यावेळी रागदारीच्या संगीतासह तयारीने सादर करण्यात आले. लहान मुलांनी सादर केलेल्या या कार्यक्रमात रसिकही गुंतले. हा कार्यक्रम डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. रंगीबेरंगी पोशाख, कृष्णाच्या वेशभूषेतील मुले आणि गोपिकांचा वेश घेतलेल्या लहान मुलामुलींनी यावेळी मोहक सादरीकरणाने उपस्थितांची दाद घेतली. रागमालिकांची मदत घेत या कार्यक्रमात एक कथा गुंफण्यात आली होती. स्क्रीनवर काही मुलांनी अभिनित केलेले दृश्य साकारण्यात आले आणि रागांची माहिती देत वेगवेगळ्या रागांवर आधारित गीतांवर मुलांनी मोहक नृत्याने यावेळी उपस्थितांना जिंकले. मालकंस, नटभैरव, तोडी, हंसध्वनी, मधुमास सारंग, यमन आदी रागांवर आधारित गीतातून कृष्णचरित्राभोवती ही गीते गुंफलेली होती. गीतांचा भाव समजून नृत्य बसविण्यात आली होती. त्यात लहान मुलांनीही अतिशय प्रामाणिकपणे नृत्य सादर करून गीतांचा आशय उपस्थितांपर्यंत सहजपणे पोहोचविला. युद्धात अर्जुन शस्त्र टाकतो तेव्हा कृष्ण त्याला गीतेचे तत्त्वज्ञान सांगतो. या आशयाच्या गीतावरील नृत्याने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. मुलांच्या निरागस सादरीकरणाने हा कार्यक्रम रंगतदार ठरला. कार्यक्रमाला शाळेच्या संचालिका राजश्री जिचकार आणि विश्वस्त रमेश गिरडे, प्रमोद जयस्वाल, राजू अकोलकर आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. नृत्य गुरु श्रीमती माडखोलकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी लता थेरगावकर, मृणालिनी काळे आदी पदाधिकारी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)