ट्यूशन सोड, माझ्यासोबत चल! पाठलाग करून १३ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग

By योगेश पांडे | Updated: August 28, 2023 16:16 IST2023-08-28T16:14:51+5:302023-08-28T16:16:31+5:30

सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Quit tuition, come with me! A 13-year-old student was molested by being chased | ट्यूशन सोड, माझ्यासोबत चल! पाठलाग करून १३ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग

ट्यूशन सोड, माझ्यासोबत चल! पाठलाग करून १३ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग

नागपूर : कोचिंग क्लासला जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा भर दिवसा विनयभंग करण्यात आला. आरोपीने मुलीला रस्त्यात अडवून तिला ट्यूशनला जाण्याऐवजी सोबत जाण्यासाठी जबरदस्ती केली. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

स्वप्नील नरेश जांभुळकर (२०, सदर) असे आरोपीचे नाव आहे. तो २२ जुलैपासून १३ वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करत होता. तो तिला अगोदरपासूनच ओळखत होता व तिलादेखील त्याच्याबाबत माहिती होती. तो काही दिवसांपासून तिला त्रास द्यायला लागला होता. रविवारी सकाळी ११ वाजता ती ट्यूशनला जात असताना स्वप्नीलने तिला अडवले आणि ट्यूशनऐवजी माझ्यासोबत फिरायला चल असे म्हणू लागला. तिने नकार दिला असता त्याने अश्लिल वर्तन करून तिचा विनयभंग केला. तिने त्याला हटकले असता त्याने तिला पाहून घेण्याची धमकी दिली. हा प्रकार विद्यार्थिनीने घरी सांगितला. तिच्या तक्रारीवरून सदर पोलीस ठाण्यात आरोपी स्वप्नीलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Quit tuition, come with me! A 13-year-old student was molested by being chased