शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

प्रदूषण शोषून शुद्ध हवा सोडणारे उपकरण, नीरीचे संशोधन  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 6:59 AM

रमन विज्ञान केंद्रातील विज्ञान मेळाव्यात संस्थेच्या स्टॉलवर हे उपकरण सादर करून पहिल्यांदाच सार्वजनिक करण्यात आले आहे.

- निशांत वानखेडेनागपूर : हवेमधील धूलिकण, रासायनिक गॅस इतर घटकांमधून होणारे प्रदूषण शोषून शुद्ध हवा बाहेर सोडणारे एक उपकरण राष्टÑीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) तयार केले आहे. पॅसिव्ह एअर रिज्युव्हेनेटिंग सिस्टीम (पार्स) असे या उपकरणाचे नाव असून, परिसरातील ८० टक्के हवा शुद्ध करण्याची त्याची क्षमता असल्याचा दावा नीरीच्या संशोधकांनी केला आहे.रमन विज्ञान केंद्रातील विज्ञान मेळाव्यात संस्थेच्या स्टॉलवर हे उपकरण सादर करून पहिल्यांदाच सार्वजनिक करण्यात आले आहे. प्रकल्प सहायक यशश्री राऊत म्हणाल्या, उपकरणात कूलरप्रमाणे एक चेंबर तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये तळाला दोन फॅन आहेत. हे फॅन प्रामुख्याने हवेतील धूलिकण, धोकायदायक गॅसेस व प्रदूषणाचे इतर घटक शोषून घेण्याचे काम करतात. चेंबरमध्ये सुपीक माती, कोकोपीट, गांडूळखत व चिलासारख्या वनस्पतींच्या मिश्रणाची जाळी लावण्यात आली आहे. चेंबरवर हवा शुद्ध करणाऱ्या टरबूज, जेड, आफ्रिकन मास्क अशा सात ते आठ प्रकारच्या वनस्पती लावण्यात आल्या आहेत. फॅनद्वारे प्रदूषित घटक ओढून घेतल्यानंतर जाळीमध्ये धूलिकण, हानिकारक गॅसेस अडकतात.नीरीने पार्स उपकरणाच्या पेटंटचा दावा केला असून, लवकरच त्यास मान्यता मिळेल. पर्यावरण कंपनीला संबंधित तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यात आले असून, लवकरच ते सर्वत्र उपलब्ध होणार आहे, असे राऊत यांनी सांगितले.काय आहे हे उपकरणया उपकरणात तळाला दोन फॅन आहेत. चेंबरमध्ये सुपीक माती व इतर मिश्रणाची जाळी लावली आहे. चेंबरच्या वर हवा शुद्ध करणाºया वनस्पती आहेत. फॅनद्वारे प्रदूषित घटक ओढून घेतल्यानंतर जाळीमध्ये धूलिकण, हानिकारक गॅसेस अडकतात आणि बाहेरील वनस्पतींच्या मदतीने शुद्ध हवा सोडली जाते.

टॅग्स :nagpurनागपूरscienceविज्ञानpollutionप्रदूषण