खासगीकरण व कंत्राटी शिक्षक भरती विरोधात मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे धरणे 

By गणेश हुड | Published: October 2, 2023 05:04 PM2023-10-02T17:04:57+5:302023-10-02T17:06:06+5:30

आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी

Protest by Backward Class Teachers Association against Privatization and Contractual Teacher Recruitment | खासगीकरण व कंत्राटी शिक्षक भरती विरोधात मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे धरणे 

खासगीकरण व कंत्राटी शिक्षक भरती विरोधात मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे धरणे 

googlenewsNext

नागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांचे खासगीकरण व कंत्राटी शिक्षक भरतीला विरोध दर्शविण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षण संघटनेच्या नागपूर शाखेतर्फे संविधान चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते. 

संघटनेचे जिल्हा सचिव  संजय धाडसे  यांचे नेतृत्वात  संविधान चौकात करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी शुभांगी सावरकर, विद्या पाटील, गीता गणवीर, बाळू वानखेडे, सुरेंद्र झोडापे, रतन गजभिये, प्रशांत टेंभुर्णे , प्रशांत भसारकर, विनोद रामटेके, संघपाल शंभरकर ,चंदू मेश्राम, संदीप गायकवाड,सुभाष कोल्हे, अशोक पाटील, श्यामकुमार बालपांडे, खोब्रागडे यांच्यासह संघटनेच्या शिक्षकांनी आंदोलनात भाग घेतला.

 अशा आहेत संघटनेच्या मागण्या 

- जिल्हा परिषद शाळेचे खाजगीकरण व शाळा दत्तक देण्याचा प्रकार शासनाने थांबवावा.
- कंत्राटी शिक्षक भरती न करता कायमस्वरुपी भरती करा.
- समूह शाळा उपक्रमाच्या माध्यमातून शाळा बंद करण्याचा प्रकार थांबवावा.
- शिक्षकांकडून करून घेण्यात येणारे अशैक्षणिक कामे बंद करावी

Web Title: Protest by Backward Class Teachers Association against Privatization and Contractual Teacher Recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.