स्पा सेंटरआड देहव्यापार, महिलेस अटक, तिघींची सुटका
By दयानंद पाईकराव | Updated: April 27, 2024 16:40 IST2024-04-27T16:38:00+5:302024-04-27T16:40:18+5:30
Nagpur : जरीपटक्याच्या रिलॅक्स स्पा द हेअर अँड ब्युटीतील घटना

Prostitution in the disguise spa center
नागपूर : स्पा सेंटरच्या आड देहव्यापाराचा अड्डा चालविणाऱ्या महिलेस गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक करून तिन पिडीत महिलांची सुटका केली आहे. यातील दोन आरोपी अद्यापही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
रक्षा उर्फ सना मनिष शुक्ला (२२, रा. रविनगर), मोहम्मद नासीर अब्दुल शकुर भाटी (४८) आणि फिरोज अब्दुल शकुर भाटी दोघे. रा. लक्ष्मी प्लाझा गॅलेक्सी अर्बन, मानकापूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही आपल्या आर्थिक फायद्यासाठी पिडीत महिलांना पेशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत होते. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला या बाबत माहिती मिळताच त्यांनी शुक्रवारी २६ एप्रिलला दुपारी ४.५० ते रात्री ८.५० दरम्यान जरीपटका येथील जिंजर मॉलमधील रिलॅक्स स्पा द हेअर अँड ब्युटीवर धाड टाकली. तेथे तिन्ही आरोपी पिडीत तीन महिलांकडून देहव्यापार करवून घेताना आढळले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तीन पिडीत महिलांची सुटका केली. तसेच आरोपींच्या ताब्यातून आयफोन व रोख ५ हजार असा एकुण ८५ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाने केली.