स्पा च्या नावाखाली देहव्यापार, तीन जणांना अटक

By योगेश पांडे | Updated: April 6, 2024 16:02 IST2024-04-06T16:01:25+5:302024-04-06T16:02:07+5:30

पडोळे चौकातील माघ अपार्टमेंट येथील चौथ्या माळ्यावर लोटस स्पा काही महिन्यांअगोदर सुरू झाला.

Prostitution in the name of spa, three arrested | स्पा च्या नावाखाली देहव्यापार, तीन जणांना अटक

स्पा च्या नावाखाली देहव्यापार, तीन जणांना अटक

नागपूर : पॉश वस्ती असलेल्या दिनदयालनगरातील पडोळे चौकातील एका स्पाच्या आड सुरू असलेल्या देहव्यापार अड्ड्याचा भंडाफोड झाला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली आहे.

पडोळे चौकातील माघ अपार्टमेंट येथील चौथ्या माळ्यावर लोटस स्पा काही महिन्यांअगोदर सुरू झाला. तेथे स्पा व मसाज पार्लरच्या नावाखाली देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळनंतर तेथे डमी ग्राहक पाठविला. त्याने इशारा देताच पोलिसांनी धाड टाकली. तेथे तीन मुली आढळून आल्या. त्यांची पोलिसांनी सुटका केली. पोलिसांनी स्पाचा मालक व संचालक मोहम्मद अल्ताफ अंसारी उर्फ अब्दुल सत्तार (२५, जयताळा बसस्टॉपजवळ), मुळचा अमरावतीतील हिवरखेड येथील ईश्वर उर्फ ईशांत सुधीर घोरपडे (२१, सुभाषनगर) व आशा अशोक पाटील उर्फ स्नेहा विरेंद्र सौदरकर (३०, शांतीनाथ सोसायटी, जयताळा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोबाईल फोन जप्त करण्यात आले. आरोपी गरीब मुलींना पैशांचे आमीष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घ्यायचे. तीनही आरोपींविरोधात प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक कविता ईसारकर, महेंद्र थोटे, लक्ष्मण चौरे, सचीन बढिये, प्रकाश माथनकर, शेषराव राऊत, अजय पौनिकर, आरती चव्हाण, पुनम शेंडे, अश्विन मांगे, नितीन वासने, समीर शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.
 

Web Title: Prostitution in the name of spa, three arrested