घरकाम करणाऱ्या महिलेचा २.५२ लाखांचा मुद्देमाल पळविला
By दयानंद पाईकराव | Updated: July 13, 2024 16:27 IST2024-07-13T16:22:20+5:302024-07-13T16:27:57+5:30
Nagpur : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना

Property worth 2.52 lakhs of a housemaid was stolen
नागपूर : घरकाम करणाऱ्या महिलेच्या घरातील रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागीने चोरून नेल्याची घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी १२ जुलेला दुपारी १.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान घडली.
विजेंद्र रमेश गायकवाड (३८, रा. कृष्ण लँडमार्क अपार्टमेंट बिल्डींग, संगम रोड वानाडोंगरी) यांचे अपार्टमेंटमध्ये दुकान आहे. त्यांची पत्नी आपल्या फ्लॅटच्या दाराची कडी लाऊन बाहेरील लोखंडी ग्रीलला कुलुप लाऊन घर कामासाठी गेली. अज्ञात आरोपीने लोखंडी गेटचे कुलुप तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. आरोपीने बेडरुममधील लाकडी आलमारीतील रोख २० हजार व सोन्याचांदीचे दागीने असा एकुण २ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी विजेंद्र यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध बिएनएसच्या कलम ३०५ (अ), ३३१ (३) नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.