विक्रीकर भरल्याशिवाय मालमत्ता नावावर होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:19 IST2021-02-20T04:19:07+5:302021-02-20T04:19:07+5:30

नागपूर : थकीत विक्रीकर जमा केल्याशिवाय मालमत्ता नावावर करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या ...

The property will not be in the name unless the sales tax is paid | विक्रीकर भरल्याशिवाय मालमत्ता नावावर होणार नाही

विक्रीकर भरल्याशिवाय मालमत्ता नावावर होणार नाही

नागपूर : थकीत विक्रीकर जमा केल्याशिवाय मालमत्ता नावावर करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मेडिन्यूट्रीना कंपनीच्या याचिकेवर दिला. तसेच, सदर याचिका फेटाळून लावली.

याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. वूड स्टॉक होल्डिंग कंपनीने पंजाब नॅशनल बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे बँकेने या कंपनीची बुटीबोरी एमआयडीसीमधील मालमत्ता जप्त करून तिचा १४ मार्च २०१७ रोजी लिलाव केला. मेडिन्यूट्रीना कंपनीने ती मालमत्ता ७१ लाख २५ हजार रुपयात खरेदी केली. तसेच, ती मालमत्ता स्वत:च्या नावावर करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राला अर्ज सादर केला. केंद्राने याकरिता त्यांना विक्रीकर विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र व इतर काही कागदपत्रे मागितली. विक्रीकर विभागाने वूड स्टॉक होल्डिंग कंपनीवर ७ लाख १७ हजार १३० रुपये विक्रीकर थकीत असल्यामुळे मेडिन्यूट्रीना कंपनीला नाहरकत प्रमाणपत्र दिले नाही. परिणामी, संबंधित मालमत्ता मेडिन्यूट्रीना कंपनीच्या नावावर होऊ शकली नाही. करिता, कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायालयाने तिला दिलासा दिला नाही.

Web Title: The property will not be in the name unless the sales tax is paid