शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

प्रॉपर्टी डीलरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By admin | Updated: January 28, 2017 01:45 IST

दुसऱ्याच्या मालकीचे भूखंड विकून २५ लाख ३१ हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या एका प्रॉपर्टी डीलरचा

दुसऱ्याचा भूखंड विकला : २५ लाखांनी फसवणूक केल्याचे प्रकरणनागपूर : दुसऱ्याच्या मालकीचे भूखंड विकून २५ लाख ३१ हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या एका प्रॉपर्टी डीलरचा अटकपूर्व जामीन अर्ज तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. अनिल श्यामराव शिंगणे (५०) असे आरोपीचे नाव असून, तो काटोल रोड नर्मदा कॉलनी येथील रहिवासी आहे. प्रकरण असे, आरोपीने बोरगाव येथील अनुक्रमे १८०० आणि ३६०० चौरस फुटाचे दोन भूखंड २४ आॅक्टोबर २०११ रोजी ८१ लाख रुपयात विकण्याचा सौदा मंजुला प्रवीण गुप्ता यांच्यासोबत मेसर्स ओएसिस बिल्डर अ‍ॅन्ड डेव्हलपर्सच्या माध्यमातून केला होता. शिंगणे याला बयानापत्रानुसार २ लाख ३१ हजार रुपये रोख देण्यात आले होते. १५० दिवसात करारनामा करण्याचे ठरले होते. मेसर्स ओएसिसचे भागीदार खुद्द मंजुला गुप्ता, रवी कांबळे रा. जुना सुभेदार आणि शुद्धोदन वाहणे रा. पॉप्युलर सोसायटी हे आहेत. १४ डिसेंबर २०११ रोजी करारनामा करून शिंगणे याला १० लाखांचा धनादेश देण्यात आला होता. १२ महिन्यात या भूखंडांचे खरेदीखत रजिस्टर्ड करण्याचे ठरले होते. मार्च २०१२ मध्ये मंजुला गुप्ता यांना असे समजले होते की, या मालमत्तेचे मूळ मालक द्वारकाप्रसाद पांडे हे असून, त्यांनी शिंगणेविरुद्ध न्यायालयात दिवाणी दावा केलेला आहे. तसेच त्यांच्या तक्रारीवरून २७ सप्टेंबर २०११ रोजी भादंविच्या ४२०, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हाही दाखल आहे. मंजुला गुप्ता यांना आॅक्टोबर २०१३ मध्ये असेही समजले होते की, शिंगणे याने या भूखंडांचा सौदा ड्रीमवे बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्सचे भागीदार शुद्धोदन वाहणे आणि चंद्रशेखर मुदलियार यांच्यासोबत ८६ लाख ४० हजार रुपयात करून १३ लाख रुपये घेतले होते.करारनामा नोटराईज केला होता. मंजुला गुप्ता यांच्या तक्रारीवरून अनिल शिंगणे आणि इतरांविरुद्ध २६ मार्च २०१६ रोजी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात भादंविच्या ४२०, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आरोपीने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता, न्यायालयाने तो फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील मदन सेनाड यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)