शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

खासगी इस्पितळांनी न्यूमोनिया रुग्णांची माहिती द्यावी :  जिल्हाधिकारी ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 01:03 IST

खासगी इस्पितळात भरती असलेल्या प्रत्येक न्यूमोनिया व कोरोना संशयित रुग्णांची माहिती जिल्हा प्रशासन किंवा आरोग्य यंत्रणेला देण्याची सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केली.

ठळक मुद्देआयएमए व विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनशी चर्चा

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : खासगी इस्पितळात भरती असलेल्या प्रत्येक न्यूमोनिया व कोरोना संशयित रुग्णांची माहिती जिल्हा प्रशासन किंवा आरोग्य यंत्रणेला देण्याची सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केली. शुक्रवारी उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी खासगी इस्पितळांचा आढावा घेतला.या बैठकीला आरोग्य सेवा नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला,विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक अरबट व आॅरेंज सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनुप मरार आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी ठाकरे यांनी खासगी इस्पितळांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय कार्यात खासगी डॉक्टर, इस्पितळ व त्यांच्या मनुष्यबळाची कशी मदत होईल यावर चर्चा केली. डॉ. झुनझुनवाला यांनी ‘आयएमए’कडून सर्व डॉक्टरांना, पॅथॉलॉजी लॅब संचालकांना व रेडिओलॉजिस्टना आपले केंद्र सुरू ठेवण्याचे आवाहन केल्याची माहिती दिली. अनेक बंद असलेले हॉस्पिटल सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. अरबट यांनी खासगी इस्पितळांमधील ५० टक्के स्टाफ येत नसल्याचे आणि सुरक्षा साधनांच्या तुटवड्याची समस्या मांडली.खासगी इस्पितळात कोव्हीड-१९ च्या संशयित व बाधित रुग्ण किंवा न्यूमोनियाचा रुग्ण आल्यास याची माहिती कुणाला द्यावी, याविषयावरही चर्चा करून जिल्हाधिकारी ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीdoctorडॉक्टर