शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

नागपूर शहरातील तीन एएसआयला राष्ट्रपती पोलीस पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 11:11 PM

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील तीन एएसआय (सहायक पोलीस उपनिरीक्षक) यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्देतिडके, ठाकरे आणि शिवलकर होणार सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील तीन एएसआय (सहायक पोलीस उपनिरीक्षक) यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये गुन्हे शाखेचे एएसआय अशोक सोमाजी तिडके, परिमंडळ ३ चे एएसआय विश्वास शामराव ठाकरे आणि वाहतूक शाखेचे एएसआय नितीन भास्करराव शिवलकर यांचा समावेश आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी तिघांचेही अभिनंदन केले आहे.केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा केली. यात नागपूरच्या तीन अधिकाऱ्यांसह महराष्ट्रातील ११ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तिघांनाही स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सन्मानित करण्यात येईल.तिडके यांनी १३१ गुन्हेगारांना केले तडीपारगुनहे शाखेचे एएसआय अशोक तिडके यांनी १३१ गुन्हेगारांना तडीपार करण्यात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांनी ३६ गुन्हेगारांना एमपीडीएअंतर्गत तुरुंगात पाठविण्यातही महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. १९८७ मध्ये पोलीस सेवेत सामील झालेले तिडके यांना डीजी अवॉर्डसह आतापर्यंत ५२८ रिवॉर्ड मिळालेले आहेत. धंतोलीतील चर्चीत हत्याकांडात आरोपीपर्यंत पाोहोचण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. माहितीचा अधिकार आणि वादग्रस्त दस्तावेजांची चौकशी यात त्यांना विशेष अनुभव आहे.ठाकरे यांनी आजवर ९३ गुन्हेगारांच्या मुसक्या बांधल्याझोन ३ मध्ये कार्यरत एएसआय विश्वास ठाकरे यांनी आतापर्यंत ९३ गुन्हेगारांना तडीपार करून त्यांच्या मुसक्या बांधल्या आहेत. ठाकरे हे १९८८ मध्ये नागपूर ग्रामीण पोलीसमध्ये दाखल झाले. १९९२ मध्ये त्यांची शहर पोलिसात बदली झाली. त्यांनी आतापर्यंत २८२ रिवॉर्ड प्राप्त केले आहेत. २०१२ मध्ये डीजी इंसिग्नियानेही त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.शिवलकर यांची बंदोबस्तात महत्त्वपूर्ण कामगिरीवाहतूक शाखेचे एएसआय नितीन शिवलकर यांना वाहतुकीच्या योग्य बंदोबस्तासाठी ओळखले जाते. ते डीजी अवॉर्डने सन्मानितसुद्धा झालेले आहेत. ते सण-उत्सव किंवा अतिविशिष्ट व्यक्तींच्या दौऱ्यात बंदोबस्त अतिशय चोखपणे सांभाळतात. १९८७ मध्ये पोलीस सेवेत सामील झालेले शिवलकर यांनी गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली आणि गुन्हे शाखेत उत्तम काम केले आहे. त्यांना अतापर्यंत वरिष्ठांकडून २२२ वेळा रिवॉर्ड मिळालेला आहे.

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षPoliceपोलिसnagpurनागपूर