शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज

By admin | Updated: September 7, 2014 00:57 IST

गणेश विसर्जनाठी भाविकांना सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मनपा प्रशासन सज्ज झाले आहे. विसर्जनासाठी ठिकठिकाणी ९५ कृत्रिम तलाव व १२ कृत्रिम टाके निर्माण करण्यात आले आहेत. विसर्जनस्थळी निर्माल्य

९५ कृत्रिम तलाव, १२ टाके : स्वयंसेवी संस्थाही मदतीला नागपूर : गणेश विसर्जनाठी भाविकांना सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मनपा प्रशासन सज्ज झाले आहे. विसर्जनासाठी ठिकठिकाणी ९५ कृत्रिम तलाव व १२ कृत्रिम टाके निर्माण करण्यात आले आहेत. विसर्जनस्थळी निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वंयसेवी संस्था मदत करीत आहे. मनपाच्या आरोग्य विभागाने विसर्जनाची तयारी केली आहे. यंदा सोनेगाव तलावात पुरेसा पाणीसाठा नसल्याने येथे मोठ्या मूर्तींचे विसर्जन होणार नाही. अंबाझरी तलावाच्या ओव्हरफ्लो भागात मूर्तीं विसर्जनाची व्यवस्था केली जाणार आहे. पीओपी मूर्तींचे शहरातील कोणत्याही तलावात विसर्जन होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. विसर्जन पर्यावरण पूरक व्हावे यासाठी सेवाभावी संस्था निर्माल्य गोळा करण्याच्या कामात व कृत्रिम तलावासाठी मदत करीत आहेत. यात ग्रीन व्हीजील फाऊं डेशन, वृक्ष संवर्धन समिती, सिंधू महाविद्यालय, जनजागृती आव्हान समिती, सृष्टी पर्यावरण मंडळ, मैत्री परिवार संस्था, निसर्ग विज्ञान संस्था, रोटरी क्लब पूर्व व ईशान्य, आगाज संस्था, रोटरी क्लब नागपूर, योग संपदा संस्था, अरण्य पर्यावरण संस्था, राजेंद्र हायस्कूल इत्यादी संस्थांचे सहकार्य आहे.गोळा करण्यात आलेले निर्माल्य वाहून नेण्यासाठी कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट व्दारे कर्मचारी व वाहने उपलब्ध होणार आहे. प्रत्येक तलावावर निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य कलशाची व्यवस्था करण्यात आली आहे. या निर्माल्यापासून गांडूळ खत निर्माण के ले जाणार आहे. या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विसर्जन सोहळा पर्यावरण पूरक व्हावा यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपाने केले आहे.(प्रतिनिधी)