नागपूर व अमरावतीसाठी वीज विकास आराखडा तयार करा

By आनंद डेकाटे | Updated: July 7, 2025 19:34 IST2025-07-07T19:33:26+5:302025-07-07T19:34:26+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : २०३५ ची विजेची गरज लक्षात घेऊन नियोजन करा

Prepare a power development plan for Nagpur and Amravati | नागपूर व अमरावतीसाठी वीज विकास आराखडा तयार करा

Prepare a power development plan for Nagpur and Amravati

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
नागपूरअमरावती जिल्ह्यात उद्योग, निवासी प्रकल्प आणि वाणिज्य क्षेत्रामुळे वीज मागणी झपाट्याने वाढते आहे. नागपूर व अमरावती मधील वीज कामांसाठी मंजूर निधीतील कामे गतीने करा. तसेच सन २०३५ मध्ये भविष्यातील वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन वीज मागणीचे नियोजन आताच करा. दोन्ही जिल्ह्यात वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास आराखडा तयार करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.

मुंबई विधानभवन येथे आयोजित नागपूर जिल्हा महावितरण आणि महापारेषण आढावा तसेच कोराडी, खापरखेडा प्रकल्पांसंदर्भात आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकीला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे,वित्त राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल,ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आ. आशिष देशमुख, आ. मोहन मते, आ. प्रविण दटके, आ. चरणसिंग ठाकूर यावेळी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,  नागपूर व अमरावती जिल्ह्यासाठी मंजूर वीज क्षेत्रातील विकासासाठी सध्या मंजूर निधीतून कामे पूर्ण करावीत आगामी कालावधीत अजनुही नवीन प्रकल्प वाढत आहेत त्यासाठी ऊर्जा विभागाने ठोस उपाययोजना करावी. नागपूर मध्ये ७१३ कोटी तर अमरावती जिल्ह्यात २४२ कोटी रूपयांचे वीज क्षेत्रातील कामांसाठी निधीची आवश्यकता भासणार आहे या निधीची तरतूद करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. 

विजेच्या सुरक्षेसाठी डक्ट प्रणालीचा वापर करा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी भुयारी केबल्सना होणाऱ्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त करीत सुरक्षित केबल डक्ट प्रणाली वापरण्याचे निर्देश दिले. तसेच सुधारित वीज क्षेत्र योजना,कुसुम-ब योजना,मागेल त्याला सौर कृषीं पंप योजना,ट्रान्सफॉर्मर क्षमतेत वाढ व नव्या वीज केंद्रांची उभारणी,नवीन वीज उपकेंद्राची मागणी या कामांना प्राधान्य देण्याची सूचना केली. 

उच्चस्तरीय बैठक, वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
बैठकीला मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, अपर मुख्य सचिव ऊर्जा आभा शुक्ला, सचिव श्रीकर परदेशी, पर्यावरण तथा वातावरणीय बदल सचिव जयश्री भोज,महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संजीव कुमार,महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ राधाकृष्णन बी.महाऊर्जा विकास संस्थेच्या महासंचालक डॉ.कांदबरी बलकवडे यासह दूरदृश्य प्रणाली द्वारे नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर उपस्थित होते. 
 

Web Title: Prepare a power development plan for Nagpur and Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.