शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL 2026 Playoffs Race : स्क्रिप्ट भारी की, मॅच? १६ गुण कमावणाऱ्यांसाठीही पोटात गोळा आणणारा ट्विस्ट
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
7
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
8
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
9
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
11
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
12
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
13
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
14
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
15
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
16
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
17
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
18
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
19
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
20
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबाच्या अटकेचा सूड उगविण्याची तयारी

By admin | Updated: May 16, 2014 00:43 IST

नक्षलवाद्यांचा ‘थिंक टँक’ मानला जाणारा दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक जी. एन. साईबाबा याच्या अटकेचा सूड उगविण्यासाठी नक्षलवादी सुरक्षा दलांवर हल्ले करू .....

नागपूर : नक्षलवाद्यांचा ‘थिंक टँक’ मानला जाणारा दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक जी. एन. साईबाबा याच्या अटकेचा सूड उगविण्यासाठी नक्षलवादी सुरक्षा दलांवर हल्ले करू शकतात,अशा प्रकारची माहिती हाती लागल्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने नक्षलप्रभावित महाराष्ट्रासह नऊ राज्यांना सतर्क केले आहे.‘अँडव्हायजरी’मध्ये म्हटले आहे. ‘अँडव्हाजरी’मध्ये ताज्या गुप्तचर माहितीचा हवालाही दिला आहे. येत्या काही महिन्यात भूमिगत नक्षल कॅडर आक्रमक होऊ शकते. साईबाबाच्या मुद्यावर सरकारवर दबाव आणण्याच्या हेतूने पुढच्या काही दिवसात आयईडी हल्लेही होऊ शकतात. संबंधित राज्य सरकारांनी यासंदर्भात दक्ष राहून आवश्यक त्या उपाययोजना कराव्या, असे ‘अँडव्हाजरी’ त म्हटले आहे.(प्रतिनिधी)

भाकपा-माओवाद्यांनी आपल्या सशस्त्र कॅडरला विशेषत: दंडकारण्य क्षेत्रातील सशस्त्र कॅडरला साईबाबाच्या अटकेचा बदला घेण्यासाठी सुरक्षा दलांवर हल्ले करा, असे आदेश दिले असल्याचे महाराष्ट्र,छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, मध्य प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांना जारी केलेल्या

जहाल नक्षलवाद्यांच्या देशभरातील चळवळीत सक्रिय असलेला आंतरराष्ट्रीय विभागाचा अध्यक्ष तसेच देशपातळीवर नक्षल चळवळीसाठी समन्वयक साईबाबा याला ९ मे रोजी गडचिरोली पोलिसांनी दिल्लीत अटक केली होती. सध्या तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. अपंग असलेल्या साईबाबाला कारागृहातील विशेष बराकीत ठेवण्यात आले आहे. त्याच्याजवळ कुणी येऊ नये, यासाठी कारागृह प्रशासन खास काळजी घेत आहे. दरम्यान, कोणताही पुरावा नसताना त्याला अटक करण्यात आल्याचा दावा करीत दिल्ली आणि देशात विविध ठिकाणी साईबाबाच्या अटकेविरुद्ध आंदोलन उभारण्याचे आदेश भाकपा-माओवादीने नक्षल सर्मथक तसेच थिंक टँक असलेल्या विचारवंतांना दिले आहे. विशेष म्हणजे, यापैकी काहींनी नक्षल्यांबद्दल सहानुभूती बाळगणार्‍या पत्रकारांपर्यंत संपर्क करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. साईबाबाचे शारीरिक अपंगत्व आणि पोलीस तपासातील नकारात्मकतेला लक्ष्य करून मीडियाने हा मुद्दा लावून धरावा, यासाठीही प्रयत्न केले जात असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने नक्षलप्रभावित राज्यांना सूचित केले आहे. गृहमंत्रालयाने आपल्या