शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

मान्सूनपूर्व तयारीत महावितरण व्यस्त :दुरुस्तीची कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:54 PM

मे महिन्याचा उत्तरार्र्ध जवळ येऊन ठेपला असून, नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या काही दिवसात उन्हाच्या तडाख्यासोबतच अधूनमधून येणारा अवकाळी पाऊस व त्यानंतर लगेचच सुरू होणारा पावसाळा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी महावितरणने विविध ठिकाणी मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत.

ठळक मुद्देफांद्या छाटणे, तारांमध्ये अडकलेले पतंग आदी काढण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मे महिन्याचा उत्तरार्र्ध जवळ येऊन ठेपला असून, नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या काही दिवसात उन्हाच्या तडाख्यासोबतच अधूनमधून येणारा अवकाळी पाऊस व त्यानंतर लगेचच सुरू होणारा पावसाळा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी महावितरणने विविध ठिकाणी मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत.साधारणत: मे महिन्याच्या उत्तरार्धात नागपूरसह संपूर्ण विदर्भात अंगाची लाही लाही करणारे तापमान असते. त्यातच अधूनमधून विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याच्या घटनाही या काळात होत असल्याचे मागील काही वर्षांतील अनुभव असून तसा अंदाजही वर्तविण्यात येत आहे. महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतील बहुतांश सामग्री ही उघड्यावर असल्याने वातावरणात होणाऱ्या बदलाचा प्रतिकूल परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होत असतो व पर्यायाने त्याचा परिणाम ग्राहक आणि ग्राहक सेवांवर होत असतो. यामुळे उन्हाळा व त्यानंतर लगेच सुरू होणारा पावसाळा हा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी महावितरण कामाला लागली आहे.महावितरणची बहुतांश विद्युत यंत्रणा उघड्यावर असल्याने वाढलेल्या झाडांच्या फांद्या तारांवर लोंबकळत असतात. या फांद्या व वेली काही ठिकाणी तारांवर घासत असतात व यामुळे विद्युत यंत्रणेची क्षति होत असते. ही हानी टाळण्याकरिता नागपूर परिक्षेत्रातील सर्व संबंधितांनी आपापल्या भागातील यंत्रणेची त्या दृष्टीने चाचपणी करून गरजेनुसार संबंधितांची पूर्वपरवानगी घेऊन या फांद्या छाटून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.वीजतारांमध्ये अडकलेले पतंग, मांजा, पताका, तोरण, फ्लॅक्स बॅनर्स, प्लास्टिक झेंडे याचाही फटका यंत्रणेला बसत असतो. यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. वीजवाहिन्यांत अडकलेले पतंग, मांजा, कपड्यांचे तुकडे किंवा तत्सम काहीही तारांवर असेल तर ते वेळीच काढून टाकण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. याशिवाय सैल झालेले गार्डिंग व स्पॅन घट्ट करणे, दोन खांबांमधील झोल पडलेल्या तारा ओढून घेणे, सर्व खांब आणि त्यांचे ताण सुस्थितीत करण्याचे कामही मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहे. वीज उपकेंद्रातील रोहित्रांमधील तेलाची योग्य पातळी राखणे तसेच ब्रिदरमधील सिलिका जेल पिंगट झाले असल्यास ते बदलण्यात येत आहे. वीज वितरण यंत्रणेत अर्थिंगचे महत्त्व अधिक आहे; याकरिता रोहित्रांचे अर्थिंग मजबूत करणे, पोल, वितरण पेट्या, फिडर पिलर्स, मिनी फिडर पिलर्स या सर्वांचे अर्थिंग सुस्थितीत करण्याचे कामही मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येत आहे.महावितरणची एसएमएस सेवावीज यंत्रणा देखभाल व दुरुस्तीसाठी प्रस्तावित वीज खंडित करण्याची (आऊटेज) पूर्वसूचना ग्राहकांना मिळावी सोबतच मीटर रीडिंग, वीज देयक, वीजपुरवठा खंडित, बिल भरण्याची मुदत आदींबाबत माहिती देण्यासाठी एसएमएस देण्याची सुविधा महावितरणने आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली असल्याने, वीज ग्राहकाने एसएमएससाठी ९२२५५९२२५५ या क्रमांकावर मेसेज पाठवून आपला मोबाईल क्रमांक नोंदवायचा आहे; सोबतच महावितरणचे आपल्या संकेत स्थळावरून, महावितरण मोबाईल अ‍ॅपवरून अथवा महावितरण कॉल सेंटरच्या १८००२३३३४३५, १८००१०२३४३५ किंवा १९१२ याक्रमांकावरूनही मोबाईल क्रमांकाची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध आहे. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरच एसएमएस सेवा उपलब्ध होत असल्याने, ग्राहकांनी या सुविधेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर