शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहिता पाळावी : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 22:22 IST

नागपूर जिल्ह्यातील आदर्श आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी करण्याकरिता सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.

ठळक मुद्देराजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यातील आदर्श आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी करण्याकरिता सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ च्या अनुषंगाने सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली बचतभवन सभागृह येथे सोमवारी आढावा बैठक घेण्यात आली.राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा, कामाची वेळ याबाबत पुरेशी आगावू सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घ्यावी. प्रस्तावित सभेच्या जागी कुणाचेही निर्बंध किंवा प्रतिबंध आदेश जारी केलेले असल्यास त्याचे पूर्णपणे पालन करावे. पक्षाची मिरवणूक काढतानाही वाहतूकीचे नियम पाळावे. मिरवणुकीमुळे अडथळा होऊ देऊ नये.सत्ताधारी पक्ष, शासन यांनी केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राज्यकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात व सर्व जाहिराती काढण्यास प्रतिबंध आहे. मतदाराला पैशाचे किंवा अन्य कशाचेही प्रलोभन दाखवू नये. मतदारांच्या जातीय समूह भावनांना आवाहन करू नये. इतर पक्ष किंवा त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर, आंधळेपणाने केलेले आरोप आणि विपर्यस्त माहिती यांच्या आधारावर टिकाटिपणी करू नये. लोकांच्या मतांचा किंवा त्यांच्या कामांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने किंवा धरणे यांचा कोणत्याही परिस्थितीत अवलंब करू नये. मिरवणुकीतील लोक क्षेपणास्त्र किंवा शस्त्र म्हणून ज्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो अशा कोणत्याही वस्तू जवळ बाळगू नये. निवडणुकीच्या काळात मद्यवाटप केल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा तसेच सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019collectorजिल्हाधिकारीnagpurनागपूर