शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

निवडणुकीच्या रंगात रंगू लागलेत राजकीय पक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीला अजून वेळ असला तरी शहरात मात्र निवडणुकीचा रंग दिसूू लागला आहे. सोशल मीडियावर प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सक्रियता वाढली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात मॅसेजेस सुरू झाले आहेत. शहरात प्रमुख राजकीय पक्षही आपली शक्ती दाखवायला लागले आहेत. आपापल्या ...

ठळक मुद्देमिशन २०१९ : सर्व पक्षांनी सुरू केली तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीला अजून वेळ असला तरी शहरात मात्र निवडणुकीचा रंग दिसूू लागला आहे. सोशल मीडियावर प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सक्रियता वाढली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात मॅसेजेस सुरू झाले आहेत. शहरात प्रमुख राजकीय पक्षही आपली शक्ती दाखवायला लागले आहेत. आपापल्या क्षमतेनुसार ते नागरिकांशी संपर्क वाढवण्याच्या कामाला लागले आहेत.भाजपा सक्रिय : नागरिकांशी संपर्क साधताहेत कार्यकर्तेमागच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादित करणारी भारतीय जनता पार्टी (भाजपा) २०१९ च्या निवडणुकीसाठी सर्वात अगोदर सक्रिय झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रूपात लोकसभेचा उमेदवारही जवळपास निश्चित आहे. त्यामुळे पक्ष आतापासूनच एकजुटीने मैदानात उतरला आहे. ‘संपर्क से समर्थन’ या अभियानांतर्गत पक्षाचे नेते व पदाधिकारी लोकांच्या घरोघरी जाऊन गेल्या चार वर्षातील सरकारने केलेल्या कामांची माहिती लोकांना देत आहेत. अनुसूचित जाती-जमातीच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी समरसता अभियानही सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रकारे महापुरुषांच्या प्रतिमा परिसर स्वच्छ करण्याची मोेहीम सुरू करून पक्षाने थेट नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याचप्रकारे ज्येष्ठ नागरिकांमध्येसुद्धा पोहोचण्याच्या दृष्टीने संमेलने आयोजित केली जात आहेत.काँग्रेस लागली संघटनेला मजबूत करण्याचा कामाला२०१४ च्या निवडणुकीत भाजपाकडून पराभव स्वीकारल्यानंतर काँग्रेस पुन्हा एकदा आपल्या संघटनेला मजबूत करण्याच्या कामाला लागली आहे. शहरातील १९५२ निवडणूक बूथवर अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक बूथवर ११ सदस्यांची एक कमिटी तयार करण्यात येणार आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी सांगितले की, जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. यावेळी पक्षाचा उमेदवार नव्हे तर संघटना निवडणूक लढणार आहे. बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांवर मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी असेल. दुसरीकडे युवककाँग्रेसमध्येही संघटनात्मक निवडणुकीसाठी नवीन सदस्य बनविले जात आहेत.शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीतमागच्या निवडणुकांमध्ये भाजपला सहकार्य करणारी शिवसेना यंदा वेगळ्याच मूडमध्ये आहे. पक्षप्रमुख उद्धव ठकरे यांनी नागपुरात येऊन शिवसैनिकांना स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पक्षाचे जिल्हा प्रमुख माजी खासदार प्रकाश जाधव यांनीसुद्धा शिवसेना ही स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करीत असल्याची बाब स्वीकार केली आहे. सध्या पक्षाने उमेदवारांच्या नावावर विचार सुरू केलेला नाही. परंतु दमदार उमेदवार मैदानात उतरविले जातील हे निश्चित, असे त्यांचे म्हणणे आहे.बसपाही शोधत आहे संधीमागच्या निवडणुकीत शहरात चांगले प्रदर्शन करणाऱ्या बहुजन समाज पार्टीने येणाºया निवडणुकीतही संधी शोधण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय स्तरावर काँग्रेससोबत आघाडी करण्याच्या प्रयत्नाचे पडसाद महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी व खासदार डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी गुरुवारी नागपुरात यासंदर्भात कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, राज्याचा दौरा करून बसपा कर्यकर्त्यांचे मत विचारात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आघाडी झाली तर बसपा आपले मत सहयोगी पक्षाच्या उमेदवाराला ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करेल. पक्षाचे अनेक नेते निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.काँग्रेससोबत आघाडी करणार राकाँपाराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भाजपासोबत लढण्यासाठी काँग्रेससोबत आघाडी करण्याचे मन बनविले आहे. पार्टीचे आमदार प्रकाश गजभिये यांचे म्हणणे आहे की, भाजपला हरविण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील. दुसरीकडे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी सांगितले की, आज शहर कार्यकारिणीच्या बैठकीत पक्ष संघटनेला मजबुती देण्यावर चर्चा झाली. प्रत्येक बुथवर १० कार्यकर्ते तयार करण्यात येतील. त्याचप्रकारे पार्टीतील युवा व महिला शाखेलाही प्रत्येक बुथवर १० कार्यकर्त्या तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूकnagpurनागपूर