शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पोलिसाने उधळल्या विद्यार्थिनींवर नोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 10:45 IST

प्रजासत्ताक दिनानिमित्त भिवापूर तालुक्यातील नांद जिल्हा परिषद हायस्कूल व माध्यमिक विद्यालयात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात नांद पोलीस चौकीचे बीट अंमलदार प्रमोद वाळके यांनी नृत्य सादर करणाऱ्या शाळकरी मुलींवर पैशांची उधळण करीत कार्यक्रमात गोंधळ घातला.

ठळक मुद्देदारू पिऊन धिंगाणानांद येथील जि.प.शाळेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: प्रजासत्ताक दिनानिमित्त भिवापूर तालुक्यातील नांद जिल्हा परिषद हायस्कूल व माध्यमिक विद्यालयात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात नांद पोलीस चौकीचे बीट अंमलदार प्रमोद वाळके यांनी नृत्य सादर करणाऱ्या शाळकरी मुलींवर पैशांची उधळण करीत कार्यक्रमात गोंधळ घातला. वाळके पोलीस असल्याने गावकऱ्यांनी हे सहन करून घेतले. मात्र खाकीचा धाक दाखवीत गोंधळ घालणाऱ्या वाळकेंवर पोलीस अधीक्षक कारवाई करणार का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.असा आहे घटनाक्रमनांद जिल्हा परिषद हायस्कूल व माध्यमिक विद्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आहे. या चौकीत चार पोलीस कर्मचाऱ्यांची तैनात आहेत. त्यापैकी दोन बंदोबस्तासाठी मौदा येथे गेले होते तर दोन हजर होते. ध्वजारोहणानंतर नांद पोलीस चौकीत गावकऱ्यांसाठी अल्पोपहाराचा कार्यक्र म आयोजित केला होता. कार्यक्र म आटोपल्यावर ९.३० वाजता उमरेड पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी मारुती आल्टोने या चौकीत आले.त्यादरम्यान या चौकीत कार्यरत असलेले बीट अंमलदार प्रमोद वाळके यांनी या उमरेड मित्र पोलिसासोबत दारू ढोसली. यानंतर हे दोघेही पोलीस उमरेडला निघून गेले. त्यानंतर प्रमोद वाळके यावरच थांबले नाही तर नांद येथील एका दारू विक्रेत्यासोबत अजूनही दारू प्यायले.त्यानंतर ते नांदच्या शाळेत सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात पोहचले. कार्यक्रमादरम्यान सहाव्या वर्गातील मुलींचे नृत्याचे सादरीकरण सूरू होते. ते मंचासमोर थोडा वेळ उभे राहिले. यानंतर लगेच मंचावर चढले व खिशात हात टाकून पैशाचे बंडल काढले व नृत्य सादर करणाऱ्या शाळकरी मुलींच्या मधोमध जाऊन मुलींवर दोनदा पैशाची उधळण केली. यावर उपस्थित नागरिकांनी आक्षेप घेतला व त्यांना मंचावरून उतरविले. वाळके यांच्या या कृत्याचा सोशल मीडियावरही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नांद पोलीस चौकीतील बीट अंमलदाराला या ठिकाणावरून कुठेही तात्काळ हलवा. शाळकरी मुलीवर पैशाची उधळण करण्याचे अशोभनीय कृत्य वाळके याने केले. मी स्वत: या पोलीस हवालदाराला स्टेजवरून उतरविले नसते तर अजून कोणता प्रकार केला असता ते सांगता येत नाही. यामुळे वाळके याची नांद येथून तत्काळ हकालपट्टी करावी.- तुळशीदास चुटे, सरपंच ग्रामपंचायत नांद

 

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन