वकिलाला धमकी देणाऱ्यास पोलिसांनी पकडले

By Admin | Updated: September 3, 2016 01:13 IST2016-09-03T01:13:52+5:302016-09-03T01:13:52+5:30

जिल्हा न्यायालयाच्या आवारात शुक्रवारी एका वकिलाला मोबाईलवर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका इसमाला

Police arrested the lawyer threatening | वकिलाला धमकी देणाऱ्यास पोलिसांनी पकडले

वकिलाला धमकी देणाऱ्यास पोलिसांनी पकडले

जिल्हा न्यायालय आवारातील घटना
नागपूर : जिल्हा न्यायालयाच्या आवारात शुक्रवारी एका वकिलाला मोबाईलवर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका इसमाला न्यायालय सुरक्षा चौकीतील पोलिसांनी पकडून सदर पोलिसांच्या स्वाधीन केले.
चंद्रकांत मुरेकर, असे आरोपीचे नाव असून तो सीताबर्डी भागातील रहिवासी आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकरण असे की, येथील कौटुंबिक न्यायालयात चंद्रकातविरुद्ध त्याची पत्नी भारती हिचा खावटीचा खटला सुरू आहे. भारतीच्या वतीने हा खटला अ‍ॅड. प्रवीण तिवस्कर हे लढत आहेत.
चंद्रकांतने खावटी म्हणून दर महिन्याला चार हजार रुपये कौटुंबिक न्यायालयात जमा करावे, असा आदेशही आहे. त्याने चिडून एक धनादेश न्यायालयात जमा केला होता. त्यावर १७ फेब्रुवारी १९१६, अशी तारीख नमूद करून तो चक्क न्यायालयातून पळून गेला होता. त्यानंतर तो न्यायालयात दाखलच झाला नव्हता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध वॉरंटही जारी झाले आहेत.
आज त्याने चक्क न्यायालय आवारात येऊन अ‍ॅड. तिवस्कर यांना मोबाईलवर अश्लील शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली, या शिवाय या वकिलाच्या लहान मुलाच्या अपहरणाची आणि ठार मारण्याची धमकीही त्याने दिली.
या धमकीने भयभीत होऊन अ‍ॅड. तिवस्कर यांनी सुरक्षा पोलीस चौकी गाठून लेखी तक्रार सादर केली. लागलीच पोलीस निरीक्षक राऊत आणि उपनिरीक्षक के. एल. तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अनिल मांगलकर, रवींद्र उके, मधुकर कुकडे, हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत आकोटकर, संतोष पांडे यांनी चंद्रकांतचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आणि सदर पोलिसांच्या स्वाधीन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Police arrested the lawyer threatening