शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

समाजभान जपणारी कविता

By admin | Updated: December 27, 2015 03:31 IST

वाङ्मय ही संवाद कला आहे. त्यामुळेच दोन रसिकांचा संवाद हे देखील साहित्य ठरते.

सुधाकर गायधनी : प्रीतगंधा कवितासंग्रहाचे प्रकाशननागपूर : वाङ्मय ही संवाद कला आहे. त्यामुळेच दोन रसिकांचा संवाद हे देखील साहित्य ठरते. कवयित्री माला पारधी म्हणजे कवितेचे बीजसत्व असणारे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या या कवितासंग्रहात प्रीतीचा गंध दरवळतो पण तरीही त्यांच्या कवितेने समाजभान सोडलेले नाही. त्यांच्या कविता भावकवितेशी नातेबद्ध आहे. त्यांच्या काही कविता गझल या आकृतीबंधांची आठवण करून देणाऱ्या आहेत, असे मत ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांनी व्यक्त केले. कवयित्री माला पारधी यांच्या ‘प्रीतगंधा’ कवितासंग्रहाचे प्रकाशन हॉटेल रंगोली येथे सुधाकर गायधनी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि. स. जोग तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे, ज्येष्ठ साहित्यिक श्यामकांत कुळकर्णी, कवयित्री डॉ. रेखा लांजेवार उपस्थित होत्या. गायधनी म्हणाले, हल्ली सर्वत्र कविता गवतासारखी पसरलेली असताना ‘प्रीतगंधा’ हे बहरलेले फुलझाड आहे. डॉ. वि. स. जोग यांनी सर्व वक्त्यांच्या वक्तव्याचा परामर्श घेत कवितासंग्रहातील सौंदर्यस्थळे आणि बलस्थाने मार्मिकपणे उलगडून दाखविली. श्यामकांत कुळकर्णी यांनी कवितासंग्रहातील कवितांचे रसग्रहण केले. शैलेंद्र लेंडे म्हणाले, कवी म्हणून स्वत:ला सिद्ध करणे हे कठीण काम आहे. त्यासाठी कवीचा अभ्यास आणि चिंतन असणे आवश्यक आहे. त्याशिवाय सिद्ध करता येत नाही. माला पारधी यांच्या कवितेतून सर्वच भाव प्रभावीपणे व्यक्त झाले आहे, असे मत व्यक्त केले. रेखा लांजेवार यांनी प्रेमकवितांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. वैशली टालाटुले यांनी तर आभार प्राप्ती पारधी यांनी मानले. याप्रसंगी माला पारधी यांनी प्रास्ताविकातून कवितासंग्रहाची निर्मितीप्रक्रिया सांगितली. (प्रतिनिधी)