शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

कवींनी केले १२१ तास अखंड काव्यवाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:12 IST

- ‘सखा माझा कृष्ण’ उपक्रम : साहित्य संपदाचे कविसंमेलन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : साहित्य संपदाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या ...

- ‘सखा माझा कृष्ण’ उपक्रम : साहित्य संपदाचे कविसंमेलन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : साहित्य संपदाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पर्वावर आयोजित केलेल्या अखंड कविसंमेलनात कवींनी सलग १२१ तास काव्यवाचन करीत विक्रमाला गवसणी घातली आहे.

‘सखा माझा कृष्ण’ या उपक्रमांतर्गत हे कविसंमेलन पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ॲड. लखनसिंह कटरे होते. यावेळी त्यांनी बोली भाषांचे महत्त्व पटवून देताना बोलीभाषांचे उच्चारशास्त्र अभ्यासण्याचे आवाहन केले. यावेळी साहित्य संपदाचे संस्थापक वैभव धनावडे व सामाजिक कार्यकर्ते मुन्नालाल रहांगडाले उपस्थित होते. समाजासाठी विशेष योगदान देणारे विकास ग्रुपचे किशोर पेटकर व हिरदिलाल ठाकरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संमेलनाच्या स्वागताध्यक्ष म्हणून जीविता पाटील यांनी जबाबदारी स्वीकारली होती. याप्रसंगी संगीता थोरात यांच्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले. ऋतुजा तायडे-महिंद्रे निर्मित सरस्वती चिन्हाचे लोकार्पण याप्रसंगी करण्यात आले. संमेलनात महंत कवी राजशास्त्री, संपदा गणोरकर व इतर निमंत्रित कवींनी काव्य रसिकांना खिळवून ठेवले. सहा वर्षीय स्पृहा मेहर हिचे काव्य सादरीकरण विशेष लक्षणीय ठरले. यावेळी मंजूळ चौधरी, वंदना मत्रे, वर्षा पटले उपस्थित होते.

..............