"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 21:02 IST2025-06-21T21:01:00+5:302025-06-21T21:02:24+5:30

मी बोललो, मी जॉर्ज फर्नांडीस यांना बघितलंय, मी अटलजींना बघितलंय, बाळासाहेब देवरस, भाऊराव देवरसांना बघितलं, दत्तोपंत ठेंगडींना बघितलं, अशा अनेक लोकांना बघितलं. ज्यांनी या संघटनेला आपलं आयुष्य दिलं. त्यांना काहीच मिळालं नाही. त्यामुळे जी भूमिका मिळेल ते काम करायचे...

Picture is still pending What exactly did Nitin Gadkari say about his role in 2029 | "पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?

"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना, 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या भूमिकेसंदर्भात विचारले असता, "गेल्या 11 वर्षांत आपण जे काही बघितले, ती केवळ एक न्यूज रील होती आणि खरा पिक्चर सुरू होणे अद्याप बाकी आहे," असे गडकरी यांनी म्हटले आहे. ते शनिवारी केंद्र सरकारच्या ११ व्या वर्षपुर्तीनिमित्त उदय निरगुडकर यांनी घेतलेल्या एका प्रकट मुलाखतीत नागपूर येथे बोलत होते.

"पक्ष जी जबाबदारी देईन ती पार पाडेन" -
पुढे बोलताना भाजपचे माजी केंद्रीय अध्यक्ष तथा विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, आमच्याकडे कार्यकर्त्याची जबाबदारी काय राहील आणि त्याने काय करावे? हे पक्ष ठरवतो. आणि विचाराल, तर मी एवढी वर्षे राजकारणात आहे, मी माझा बायोडाटाही कधी छापला नाही आणि मला न मागता... मी लोकांना सांगतो, पोस्टर लावू नका, बॅनर लावू नका, कटाऊट लावू नका. मी ४०-४५ वर्षांपसून राजकारणात माझ्या स्वागताला विमानतळावर कुत्राही येत नाही. आता कुत्रा यायला लागलाय कारण मी झेड प्लस असल्याने तो कुत्रा एक राऊंड मारून जातो.

मी बोललो, मी जॉर्ज फर्नांडीस यांना बघितलंय, मी अटलजींना बघितलंय, बाळासाहेब देवरस, भाऊराव देवरसांना बघितलं, दत्तोपंत ठेंगडींना बघितलं, अशा अनेक लोकांना बघितलं. ज्यांनी या संघटनेला आपलं आयुष्य दिलं. त्यांना काहीच मिळालं नाही. त्यामुळे जी भूमिका मिळेल ते काम करायचे.

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याच्या दिशेने काम करणे माझी वैयक्तिक इश्चा -
गडकरी पुढे म्हणाले, माझी स्वतःची आवड म्हणाल तर, विदर्भातील शेतकरी जे आत्महत्या करतात, त्या एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये, असा प्रकारचे काही काम करण्याचा मी प्रयत्न करतोय. मला गेल्या अनेक वर्षांत बरेच काही मिळाले आहे. मी तृप्त आहे. मी रस्त्यांपेक्षाही, शेती संदर्भात अधिक काम करतो, मी वेगवेगळ्या क्षेत्रात अधिक काम करतो."


 

Web Title: Picture is still pending What exactly did Nitin Gadkari say about his role in 2029

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.