शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

नागपुरात १५ दिवसात पेट्रोलमध्ये १.२२ रुपयांची घसरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 9:55 PM

तेल कंपन्यांनी गुरुवारही इंधन दरात कपात केली. २३ जुलैच्या पेट्रोलच्या प्रति लिटर ७९.५७ रुपये दरानुसार ७ ऑगस्टपर्यंत १.२२ रुपयांची कपात झाली आहे तर डिझेल ४३ पैशांनी कमी झाले.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत कपात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरानुसार तेल कंपन्याकडून भारतीय बाजारात पेट्रोल-डिझेलचा दर दररोज बदलला जातो. यानुसार तेल कंपन्यांनी गुरुवारही इंधन दरात कपात केली. २३ जुलैच्या पेट्रोलच्या प्रति लिटर ७९.५७ रुपये दरानुसार ७ ऑगस्टपर्यंत १.२२ रुपयांची कपात झाली आहे तर डिझेल ४३ पैशांनी कमी झाले.५ जुलैच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर प्रत्येकी दोन रुपये अधिभार लावल्यानंतर नागपुरात ६ जुलैला पेट्रोलचे दर इतर करांसह २.४२ रुपये आणि डिझेल २.५० रुपयांनी वाढले होते. अर्थात पेट्रोल ७६.७० रुपयांवरून ७९.१२ रुपये आणि डिझेल ६७.९९ रुपयांवरून ७०.४९ रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर घसरण सुरू झाली. पण २३ जुलैला पेट्रोलचे दर पुन्हा ७९.५७ रुपयांपर्यंत वाढले आणि डिझेल प्रति लिटर ७०.०२ रुपयांपर्यंत खाली आले. त्यानंतर इंधन कपात सुरूच आहे. २९ जुलैला पेट्रोल ७०.१५ रुपये, १ ऑगस्टला ७८.९७ रुपये, २ ऑगस्टला ७८.८१ रुपये, ६ ऑगस्टला ७८.४० रुपये आणि ७ ऑगस्टला दर ७८.३५ रुपयांपर्यंत खाली आले. वास्तविक पाहता ५ जुलैनंतर पेट्रोलच्या दरात ७७ पैसे आणि डिझेलचे दर ४३ पैशांनी कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ७० रुपयांवरून ५८ डॉलरपर्यंत उतरल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दरदिवशी घसरण पाहायला मिळत आहे. इंधनाचे दर आणखी कमी होण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.

टॅग्स :Petrolपेट्रोलnagpurनागपूर